Breaking News
उरण ः डॉक्टर स्मायली पॉल ह्यांनी पहिल्या क्लासिक फॅशन फिएसस्टा चे वाशी एक्जीबिशन सेंटर, नवी मुंबई येथे आयोजन केले होते. ह्यात एकूण 200 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातून गेल्या एक महिन्यात अनेक राऊंडचे अडथळे पार पाडून फायनल टॉप 10 मध्ये स्वरांगीची निवड झाली. युईएस कॉलेज,उरण मध्ये इयत्ता बारावी कॉमर्समध्ये शिकणारी व कुंभारवाडा, उरण येथे एका मध्यम वर्गीय कुटुंबात राहणारी स्वरांगी गणेश जाधव हिने फायनल मध्ये मिस टीन नवी मुंबई 2024 तसेच गॉडेस ऑफ एलिगन्स हे दोन टायटल, ॲक्टर व मॉडेल मिस इंटरनॅशनल वर्ल्ड सुपर मॉडेल 2022 मिस जुई पागनीस तसेच महागुरू मेरी पॉल मॅडम ह्यांच्या हस्ते स्वरांगी जाधव हिला मिळाले. सदर पुरस्कार मिळाल्याने स्वरांगी जाधव वर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
स्वरांगी 3 वर्षांची असल्यापासून भरतनाट्यम शिकतेय. स्वरांगीने 8 वर्ष भरतनाट्यम कोर्स केला, तसेच 3 वर्षे हिपहॉप शिकली. त्यानंतर उरण परिवर्तन ग्रुप,उरण नृत्य स्पर्धेत सहभागी, तसेच आयसीएसीटीआयोजित फेम आयडॉल नृत्य स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मुंबई येथील लाला लजपतराय कॉलेज मध्ये शो डान्सचे सादरीकरण केले. ह्याशिवाय फॅन्सी ड्रेस, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, 400 रीले धावणे, स्किपिंग करणे इत्यादी शाळेतील विविध स्पर्धांमध्ये स्वरांगीने बक्षीसे मिळविली आहेत. उरंणकर्स आयोजित पहील्याच फॅशन स्पर्धेत अंतिम फेरीत पोचली, तर त्याच उरणकर्स आयोजित नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. यावर्षी द्रोणागिरी स्पोर्ट्स आणि द्रोणगिरी महोत्सव स्पर्धेमध्ये नृत्य स्पर्धेत सहभागी झाली होती. आता वाशीत आयोजित ‘क्लासिक फॅशन फिएसस्टा' चा मिस टीन नवी मुंबई 2024 किताबही तिने पटकावला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai