Breaking News
उरण ः उरण शहरातील विमला तलाव (गार्डन )येथे दर महिन्याच्या 17 तारखेला कवी संमेलन मोठया उत्साहात संपन्न होते. या चालू महिन्यात म्हणजेच 17 फेब्रुवारी व 18 फेब्रुवारी 2024 रोजी 100 वे कवी संमेलन एस.एस.पाटील इंटरनॅशनल स्कूल, फुंडे, उरण येथे भव्य बक्षिसांच्या, काव्यस्पर्धेच्या रूपात संपन्न होणार आहे.
उरणला विमला तलावावर मागील 8 वर्षे 3 महिने ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत कवी संमेलने पार पडली आहेत. एकूण 99 कवी संमेलन पार पडली असून 17 फेब्रुवारी 2024 रोजी 100 वे राज्यस्तरीय कवी संमेलन उरण तालुक्यात मोठया उत्साहात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्यातून निवडलेल्या 102 कवींमधून 20 कवींना जवळजवळ एक लाखांची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. ही स्पर्धा एकूण चार गटात होणार असून राज्यस्तरीय खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकांचे बक्षीस 25000 रुपयांचे आहे. या संमेलनाचे अध्यक्ष रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील असून कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे या संमेलनाला आशीर्वाद आहेत. संस्थेचे विश्वस्त रमेश कीर, अध्यक्ष नमिताताई कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदिप ढवळ,रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आजपर्यंत संपन्न झालेल्या प्रत्येक कवी संमेलना मध्ये दोन नागरिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. 100 व्या आयोजित संमेलनात उरण तालुक्यातील प्राचार्य शामा सर, प्राचार्य प्रल्हाद पवार , प्राचार्य एल. एम.भोये, चित्रकार प्रकाश पाटील,मिसेस महाराष्ट्र श्वेता राजकुमार, जलतरणपटू मयंक म्हात्रे ,फिल्म मेकर तेजस पाटील ,ह.भ.प.भालचंद्र म्हात्रे महाराज यांना गौरविण्यात येणार आह े.पारितोषिक वितरणाला ऑल जर्नालिस्ट फ्रेंड्स महाराष्ट्रचे अध्यक्ष गणेश कोळी,संजय गुंजाळ, मिलिंद खारपाटील, सुनिता जोशी, साहेबराव ठाणगे,ए.डी पाटील,ईशान संगमनेरकर इ.ची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी जेष्ठ साहित्यिक, कवी, लेखक, साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर, तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवर, रसिक प्रेषक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai