Breaking News
उरण ः धुतुम-दिघोडे गावाजवळील खाडीत लहान होडीतुन मासेमारीसाठी गेलेल्या आदिवासीं बांधवांच्या अंगावर पायवाटेवरील पूल कोसळून दोन आदिवासीचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना 26 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7:00 वाजताचे सुमारास घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या वृत्तानुसार धुतुम-दिघोडे गावाजवळील खाडीत वीट भट्टीवर काम करीत असलेले आदिवासी लहान होडीतुन मासेमारीसाठी गेले असता खाडीवरील पायवाट सुरू असलेला मागील कित्येक वर्षी बांधण्यात काँक्रिट पूल अचानकपणे आदिवासीच्या अंगावर कोसळून अविनाश सुरेश मिरकुटे रा- सापोली, ता-पेण,राजेश लक्ष्मण वाघमारे रा-वरसई- कटोरी, ता-पेण यांचा जागीच मृत्यू झाला असून, गुरु सदानंद कातकरी व सुरज श्याम कातकरी रा.वेश्वी आदिवासीवाडी,ता - उरण हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटना स्थळी उरण पोलिस ठाण्याचे गुन्हे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कांबळे त्यांच्या पोलिस पथकासह दाखल झाले असून,सदरचा पूल कोसळल्याने हा अपघात कशामुळे झाला आणखी सोबत किती आदिवासी किंवा अन्य कोण होते.याचा तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai