Breaking News
आजच्या डिजिटल युगात गुंतवणूकदारांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स हा एक मोठा आधार झाला आहे.ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. विशेषतः म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे अनेक लोक फसवणुकीला बळी पडत आहेत. सोशल मीडियावर, बनावट ॲप्स आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने तयार केलेले खोटे व्हिडिओ वापरून लोकांना आकर्षित केले जाते. अशा गोष्टींपासून सावध राहणे खूप महत्त्वाचे आहे.
म्युच्युअल फंड आणि शेअर गुंतवणूकदारांची फसवणूक कशी केली जाते?
1. बनावट ॲप्स आणि वेबसाइट्स
काही लोक बनावट ॲप्स किंवा वेबसाइट्स तयार करून तुम्हाला “झटपट पैसे दुप्पट करा“ अशा भूलथापा देतात. हे ॲप्स अनेकदा नामवंत बँका किंवा गुंतवणूक संस्थांच्या नावाचा गैरवापर करतात.
2. सोशल मीडिया रील्स आणि जाहिराती
सोशल मीडियावर काही आकर्षक रील्स दाखवून प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या नावाचा वापर केला जातो. या रील्स किंवा एआयने तयार केलेल्या व्हिडिओंमध्ये मोठ्या व्यक्तींच्या नावाने बनावट प्रॉडक्ट्स किंवा ॲप्सची जाहिरात केली जाते.
3. सेलिब्रिटींचा गैरवापर:
ऑनलाइन फसवणुकीत बनावट एआय व्हिडिओ आणि रील्सचा वापर केला जातो, जिथे नामवंत सेलिब्रिटी किंवा उद्योजक एखाद्या ॲपचे प्रमोशन करताना दाखवले जातात. अशा व्हिडिओंमुळे लोकांना त्या ॲपवर विश्वास वाटतो, आणि ते फसवले जातात.
4. फसवे एसएमएस आणि ईमेल्स
“तुम्ही अमुक योजना निवडल्यास दुप्पट परतावा मिळेल“ असे भासवणारे एसएमएस किंवा ईमेल पाठवले जातात. या लिंकवर क्लिक करताच तुमची माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो.
5. व्हाट्सॲप फसवणूक
काही बनावट गुंतवणूक योजना व्हाट्सॲपवर शेअर केल्या जातात, ज्या कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देण्याचे वचन देतात. व्हाट्सॲप किंवा एसएमएसद्वारे लिंक पाठवली जाते, जिथे क्लिक केल्यावर फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता असते.
अशा फसवणुकीपासून बचाव कसा कराल?
सावध राहा, पैसे वाचवा- “सावधगिरी हाच तुमच्या गुंतवणुकीचा खरा साथीदार आहे.”
- सुशांत पटनाईक (नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक) प्रोप्रायटर- रिलायबल इनवेस्टमेंट
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai