Breaking News
कधी विचार केला आहे का, अनपेक्षित आजार किंवा अपघातामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला किती मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते? आपल्या संपूर्ण नियोजनाला एका झटक्यात संपवू शकतो. आयुष्यभर जपलेली बचत एका रात्रीत संपून जाईल, आणि आपण आपल्या कुटुंबीयांवर किंवा मित्रांवर आर्थिक मदतीसाठी अवलंबून राहू लागू. अशा वेळी आरोग्य विमा तुमच्या आयुष्याला आणि आत्मसन्मानाला आधार देऊ शकतो.
आजच्या काळात आरोग्य विमा ही फक्त एक गरज नाही, तर ती प्राथमिकता आहे. जीवन अनिश्चित आहे. कालपर्यंत अगदी तंदुरुस्त असणारी व्यक्ती आज हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ येऊ शकते. अनपेक्षित आजारपणामुळे आलेल्या मोठ्या हॉस्पिटल खर्चामुळे अनेकांच्या आयुष्यभराची मेहनतीने केलेली बचत एका रात्रीत संपून जाते. मग कुटुंबीय आणि मित्रांकडे आर्थिक मदतीसाठी हात पसरवावा लागतो. अशा वेळी स्वतःला असहाय्य वाटतं आणि कधी कधी आत्मसन्मानाला तडा जातो. पण योग्य वेळी घेतलेला आरोग्य विमा या सगळ्यापासून वाचवतो.
मोठ्या शस्त्रक्रियांसाठी लाखोंचा खर्च येतो. दीर्घकालीन आजारांवर उपचार करताना महिनोनमहिने पैसे खर्च होतात. हॉस्पिटलमध्ये दाखल होणे, औषधे, डॉक्टरांची फी, आणि उपचार यामुळे जपलेली बचत संपून कर्ज काढण्याची वेळ येते. आरोग्य विमा असल्यामुळे अनपेक्षित वैद्यकीय खर्चाचा भार तुमच्यावर न येता विमा कंपनी उचलते. यामुळे तुमची मेहनतीची बचत सुरक्षित राहते. नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला उपचारांसाठी एक पैसाही भरायची गरज पडत नाही. कॅशलेस सुविधा ही आरोग्य विम्याचा मोठा फायदा आहे. आरोग्य विमा असल्यामुळे अनपेक्षित प्रसंगांमध्येही तुम्हाला मानसिक आधार मिळतो. आरोग्य विम्यामुळे तुम्हाला आयकर अधिनियमाच्या कलम 80 अंतर्गत करसवलत मिळते, जे एक अतिरिक्त आर्थिक लाभ आहे. आरोग्य विम्यामुळे तुमची बचत सुरक्षित राहते, आणि तुम्ही ती तुमच्या स्वप्नांसाठी वापरू शकता.
इतर कोणतीही गुंतवणूक किंवा विमा योजना तुमच्या वैद्यकीय गरजांना त्वरित हाताळू शकत नाही. जीवन विमा तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाला फायदा देतो, पण आरोग्य विमा तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी लढतो. तो तुमचं आयुष्य वाचवतो, तुमचा आत्मसन्मान जपतो, आणि तुमचं भविष्य सुरक्षित ठेवतो
कल्पना करा, तुमचं कुटुंब आनंदाने जीवन जगत आहे, पण अचानक तुम्हाला गंभीर आजार झाल्याचं कळतं. डॉक्टरांचे बिल, औषधांचा खर्च, आणि रुग्णालयातील खर्च पाहून तुमची बचत संपते. शेवटी कुटुंबीय आणि मित्रांकडे मदतीसाठी जावे लागते. त्या वेळची असहाय्यता आणि दु:ख कशालाही तोलता येणार नाही. पण जर तुमच्याकडे आरोग्य विमा असता, तर ही परिस्थितीच निर्माण झाली नसती. आजकाल वैद्यकीय उपचार प्रचंड महाग झाले आहेत. आरोग्य विमा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा देतो. शस्त्रक्रिया, औषधे, चाचण्या यांचा खर्च विमा कव्हर करतो. आरोग्य विमा ही केवळ एक गुंतवणूक नसून तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करणारी ढाल आहे आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची खात्री आहे. अनपेक्षित प्रसंगांमध्ये तो तुमचा आत्मसन्मान टिकवून ठेवतो आणि आर्थिक संकटांपासून दूर ठेवतो.कोणत्याही गुंतवणुकीच्या आधी आरोग्य विम्याला प्राधान्य द्या. कारण आरोग्य असेल तरच आयुष्य आहे आणि आर्थिक सुरक्षितता असेल तरच जीवन आनंददायी आहे. आजच योग्य आरोग्य विमा योजना निवडा, कारण आज घेतलेला हा निर्णय तुमचे उद्याचे आयुष्य आणि तुमचं भविष्य सुरक्षित करेल.
-सुशांत पटनाईक , (विमा आणि गुंतवणूक सल्लागार) , प्रोप्रायटर- रिलायबल इनवेस्टमेंट
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai