Breaking News
नवी मुंबई : देश-विदेशातील पर्यटकांना आता शहरातही ‘टुरिस्ट होम’ मिळणार आहे. पर्यटन संचालनालयाच्या नवीन योजनांमुळे पर्यटकांना याचा लाभ घेता येणार आहे.
पर्यटन संचालनालय अंतर्गत पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरिता विविध योजना राबविण्यात येतात. देश-विदेशातील पर्यटकांच्या निवासव्यवस्थेकरिता टुरिस्ट होम, होम स्टे, पर्यटन व्हिला, पर्यटक अपार्टमेंट इत्यादी बाबतचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. संचालक, पर्यटन संचालनालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार टुरिस्ट होम, होम स्टे, पर्यटन व्हिला, पर्यटक अपार्टमेंट या योजनेच्या माध्यमातून पर्यटन व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. देश-विदेशातील महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांना शहरातील जीवनशैली, संस्कृती आणि पारंपारिक यांचा जवळून अनुभव घेता येणार आहे. तसेच स्थानिक स्वंयपाक, मराठमोळे पाहुणचार व कुटुंबातील गप्पा गोष्टींमुळे पर्यटकांचा प्रवास अधिक संस्मरणीय होईल.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता पर्यटन संचालनालय, कोकण विभागामार्फत नोंदणीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या विभागातील नागरिकांनी तसेच पर्यटक व्यवसायिकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन कोंकण विभागीय पर्यटन कार्यालयाच्या प्र.उपसंचालक शमा पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai