Breaking News
शरद पवार गटाच्यावतीने सिडको व पालिकेवर धडक
नवी मुंबई : नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त, माथाडी कामगार, अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि झोपडपट्टीवासीयांना वाढीव बांधकामाप्रकरणी सिडको व नवी मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिसांच्या विरोधात तसेच या गरजेपोटी घरांवर कारवाई करण्यात येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने (शरदचंद्र पवार गट) गुरुवारी (ता. 31) सिडको व महापालिकेच्या मुख्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रत्येक नोडमधील नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त, माथाडी कामगार व अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांच्या घरांना पालिकेने व सिडकोने अनधिकृत बांधकाम ठरवून त्यांना नोटीसा दिल्या आहेत. मात्र या बांधकामांवर कारवाई न करता गरजेपोटी बांधलेली घरे व त्याखालील जमिनींचे कायदेशीर नियमन सिडको व महापालिकेने त्वरित करावे अशी मागणी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने (शरदचंद्र पवार गट) केली आहे. शासनाने गरजेपोटी घरे नियमीत होण्यासंदर्भात जीआर निघाल्याचे वारंवार सांगितले जाते, मात्र त्याची अमंलबजावणी कधी होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात प्रकल्पग्रस्त, माथाडी, एलआयजीची घर वाचविण्यासाठी सिडको व पालिका मुख्यालयावर 31 जुलैला जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सीवूड्स सेक्टर न्यू-50 येथील गंगारामशेठ तांडेल चौकातून निघून सिडको आणि नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे. हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.
विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून, यात गृहनिर्माण व जमिनीचे नियमन, स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे आणि त्याखालील जमिनींचे कायदेशीर नियमन सिडको व महापालिकेने त्वरित करावे. नवी मुंबई महापालिका, सिडको आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पांमध्ये स्थानिक बारवी प्रकल्पग्रस्तांना स्थायी नोकऱ्या मिळाव्यात, सिडकोकडे राखून ठेवलेले 3.75 टक्के सामाजिक सुविधा भूखंड प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक उपयोगासाठी वाटप करावेत. नवी मुंबईतील विकसकांना विक्री केलेले समाजोपयोगी भूखंड नागरिकांच्या हितासाठी महापालिकेला हस्तांतरित करावेत, आदी मागण्यांचा समावेश आहे. प्रत्येत नोडमधील नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले आहे. वाशी येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान महिलाध्यक्षा सलुजा सुतार, युवक अध्यक्ष अन्नु आंग्रे,ऐरोली विधानसभा अध्यक्ष झुल्फीकार कुरेशी,बेलापूर विधानसभा अध्यक्ष राहुल म्हात्रे, वाशी तालुका अध्यक्ष सतनाम सिंग,प्रवक्ते राजुदेशमुख, सैल आध्यक्ष अमीतजी भोइर साहेब, माछीमार सेल आध्यक्ष प्रविणजी पाटील साहेब व इत्तर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai