Breaking News
फळपिकांबद्दल तांत्रिक माहिती व कीड रोगाबद्दल मार्गदर्शन
नवी मुंबई : कोकणातील फळपिकांवरील कीड व रोगांची ओळख, त्या रोगांच्या नियंत्रणाबाबत उपाययोजना तसेच हवामानातील बदल व अवेळी पावसामुळे होणार्या रोगांच्या प्रादूर्भावावर वेळीत नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण 5 जिल्ह्यांमधील 36 तालुक्यात हॉर्टसॅप हा प्रकल्प 1 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे अशी माहिती कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.
आकस्मिकरित्या उद्भवणार्या कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिक उत्पादनाची घट विचारात घेता प्रभावी जलद उपाययोजना होण्याच्या दृष्टीने प्रमुख फळपिकांसाठी ही योजना राबविण्यात येते. राष्ट्रीय एकात्मिक किड व्यवस्थापन केंद्र भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली, कृषी विद्यापीठे, विविध संशोधन केंद्रे व कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयाने या योजनेचे कामकाज चालते. यासाठी कमीत-कमी 500 तर जास्तीत-जास्त 2 हजार हेक्टर क्षेत्रासाठी एक किड सर्व्हेक्षक/कृषी पर्यवेक्षक गावातील निश्चित केलेल्या प्लॉट व रँडम प्लॉटमधून आठवड्यातील दर सोमवार-मंगळवार, गुरुवार-शुक्रवार या दिवशी सर्व्हेक्षण करून पिकांची अवस्था व कीड रोगांचे निरीक्षण करून अहवाल नोंदविला जातो. कीड नियंत्रक/कृषी अधिकारी सदर नोंदी योजनेच्या संकेतस्थळावर नोंदवितात. कीड व रोगाचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास कृषी विद्यापीठामार्फत यावर डव्हायझरी पाठविण्यात येते आणि त्यानुसार कीड व रोगाच्या नियंत्रणाचे उपाय केले जातात.
फळ पिकांबद्दल तांत्रिक माहिती व कीड रोगाबद्दल मार्गदर्शनासाठी प्रक्षेत्रावर शेतीशाळा आयोजित केल्या जातात. कोकण विभागात आंबा फळपिकाच्या 36 व काजू करिता 21 शेतीशाळा असून यासाठी क्षेत्रीय अधिकार्यांना प्रशिक्षण देण्यात येते. याचाच भाग म्हणून क्रॉपसॅप योजनेतील फलोत्पादन पिकांवरील कीड व रोग सर्व्हेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प हॉर्टसॅप सन 2021-22 अंतर्गत आंबा व काजू या फळपिकांकरिता कोकण विभागातील क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांच्याकरीता 30 सप्टेंबर 2021 रोजी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यामार्फत ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी हॉर्टसॅप योजनेतील कृषि विभागाचे अधिकारी आंबा-काजू पिकाच्या कीड व रोग प्रादूर्भावाच्या नियंत्रणाबाबत कोकण कृषी विद्यापीठाचे समन्वयाने काम करतील. तसेच कीड व रोग प्रादूर्भावावर वेळेत उपाययोजना करतील असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai