Breaking News
विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचा सन्मान
नवी मुंबई ः 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत सहभागी विभाग आणि कार्यालये यांच्या अंतरिम प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत घेतला. यावेळी कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचा 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या मोहिमेअंतर्गत प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन हे अधिक लोकाभिमुख व पारदर्शक व्हावे या करिता 07/05/2025 ते 02/10/2025 या कालावधील राज्यात 150 दिवसांची ई-गव्हर्नन्स सुधारणांची मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कामगिरीचे संकेतस्थळ, डॅशबोड, आपले सरकार पोर्टल, ई-ऑफिस प्रणाली, व्हॉटस ॲप चॅनल, चॅटबोट, एआय/ब्लॉक चेन जीआयएस प्रणाली चा वापर या निकषांवर 29 ऑगस्ट रोजी अंतरिम मूल्यमापन करण्यात आले, या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक कार्यालयामधुन विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, नवी मुंबई या कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचा 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या मोहीमेअंतर्गत प्रथम क्रमांक आल्याबददल प्रशस्तीपञक देवून सन्मान करण्यात आला. शासनाच्या सर्व विभागांना 150 दिवसांच्या दिलेल्या कार्यक्रमामध्ये ई-प्रशासन सुविधा, आपले सरकार, ई-ऑफीस, डॅशबोर्ड, नाविन्यपूर्ण कार्यक्रम, संकेतस्थळ अद्ययावतीकरण, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश आहे. यामध्ये केलेल्या कामाच्या आधारावर 200 मार्कांचे मूल्यमापन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र यांचे सागरी सुरक्षेसाठी अधिकृत ‘समुद्र संदेश’ या व्हाटस अप चॅनलचे सहयाद्री अतिथीगृह येथे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, आदी मान्यवर उपस्थित होते.
या व्हाटस अप चॅनल द्वारे कोकण परिक्षेत्रातील नागरीकांच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन आपत्ती व्यवस्थापन, मासेमारी व्यवसाय सुरक्षा विषयक माहीती देण्यासाठी तसेच विविध विषयांवर जनजागृतीचे संदेश पाठविण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. सदर व्हाटस अप चॅनल दवारे संवाद होणार असल्याने नागरीकांना अवैध शस्त्र, अंमली पदार्थ तस्करी, संशयीत बोट इत्यादीची माहीती देता येणार आहे. तरी कोंकण परिक्षेआतील सर्व नागरीक, सागरी सुरक्षा दल, ग्राम रक्षक दल यांनी सोबत जोडलेल्या क्यु आर कोड स्कॅन करुन “समुद्र संदेश“ या व्हाटस अप चॅनलच्या ‘सुरक्षित समुद्र सुरक्षित किनारा’ या मोहीमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai