उत्कृष्ट ग्रंथालये आणि ग्रंथालय सेवकांना राज्य सरकारकडून पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 29, 2025
- 139
30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार” आणि “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” देण्यात येतात. सन 2024-25 करिता या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती ग्रंथालय संचालनालयाचे प्र.ग्रंथालय संचालक, मुंबई यांनी कळविले आहे.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिका चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध व्हाव्या, वाचन संस्कृती सृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच ग्रंथालय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करणे हा आहे.
पुरस्कारांचे प्रकार व बक्षिसे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार
- राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ या वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रु. 1 लाख, रु. 75 हजार, रु. 50 हजार, रु. 25 हजार इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे.
राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु. 50 हजार तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु. 25 हजार इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे. सन 2024-25 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक(ग्रंथमित्र) यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह तीन प्रतीत दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये तसेच ग्रंथालय कार्यकर्ते आणि ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) या सर्वांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावा, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र. ग्रंथालय संचालक, मुंबई अशोक मा. गाडेकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai