सिडकोमध्ये हिरकणी कक्ष उपक्रम सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 15, 2025
- 250
नवी मुंबई ः शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सिडको महामंडळात हिरकणी कक्ष उभारण्यात आला असून, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत या कक्षाचे उद्घाटन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्माननीय कार्यपरिसर मिळणार आहे.
हिरकणी कक्ष हा महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सन्मान आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला विशेष कक्ष आहे. मातृत्व रजेनंतर कार्यालयात पुनरागमन करणाऱ्या महिलांसाठी हा कक्ष सुरक्षित, स्वच्छ आणि खाजगी वातावरण देतो. येथे स्तनपानासाठी स्वतंत्र व आरामदायी जागा, बाळासाठी पाळणा, खेळणी, स्वच्छ पिण्याचे पाणी, विश्रांतीसाठी आरामदायी आसनव्यवस्था, पंखा, वातानुकूलन, तसेच आवश्यक स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचा उद्देश महिलांना त्यांच्या मातृत्वाच्या काळात मानसिक आणि शारीरिक आराम मिळवून देणे, तसेच कार्यस्थळी त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा कक्ष कार्यस्थळी मातृत्वास अनुकूल वातावरण निर्माण करतो. याचबरोबर सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि त्या अनुषंगिक गरजांचा विचार करून हा कक्ष सुसज्ज करण्यात आला आहे. या प्रसंगी डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडकोतसेच विभाग प्रमुख, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सिडकोतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्माननीय कार्यपरिसर मिळणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सिडकोची बांधिलकी अधिक बळकट होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai