Breaking News
नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79 वा वर्धापन दिन कोंकण भवन येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी कोंकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले.
या कार्यक्रमास नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, नवी मुंबई पोलीस सहआयुक्त संजय ऐनपुरे, नवी मुंबई पोलीस अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, अपर आयुक्त कोकण विभाग विकास पानसरे, अपर आयुक्त (महसूल) वैशाली इंदानी-उंटवाल, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, अपर आयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, अपर आयुक्त (विकास आस्थापना) मिनल कुटे, उपायुक्त (नियोजन) प्रमोद केंभवी, सह आयुक्त(पुनर्वसन) रवि पाटील, अपर आयुक्त (विकास) माणिक दिवे, सह आयुक्त (रोहयो) डॉ. हारकर, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, माजी सैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत शुभेच्छा संदेश फलक लावून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोकण भवन इमारत तिरंगी रंगाच्या रोषणाईने सजवण्यात आली होती. पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य करणारे सीबीडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ, गुन्हे शाखा सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे, नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक मयुर पवार, वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते, कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभय काळे या विशेष सेवापदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
नवी मुंबई पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai