Breaking News
नवी मुंबई ः शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांना व सेवकांना पुरस्कार देवून गौरव केला जातो. यंदाचा मुंबई विभागीय “डॉ. एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व ग्रंथमित्र पुरस्कार” हा पुरस्कार नवी मुंबईतील वाशी येथील प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष सीताराम कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला आहे.
जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शासनमान्य ग्रंथालयांचे योगदान लाभावे, यासाठी ग्रंथालयांचा गुणांकन विकास व्हावा, तसेच या ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा मिळाव्यात, या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांना व सेवकांना अनुक्रमे “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व ग्रंथमित्र पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2023-24 या वर्षासाठीच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी एस. एन. डी. टी. महाविद्यालयाच्या पाटकर सभागृहात उच्च शिक्षण आणि तंत्रद्यान मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलमताई गोरे याच्या शुभहस्ते झाला.
ठाणे जिल्ह्यात उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट कार्यकर्ता असे दोन पुरस्कार मिळाल्याने जिल्ह्यातील ग्रंथालय कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे. सुभाष कुळकर्णी यांची नवी मुंबईच्या सांस्कृतिक कार्याचा आधारवड अशी ओळख असून, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्त्याचा पुरस्काराने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai