Breaking News
नवी मुंबई ः वाहने भाडेतत्वावर लावण्याच्या बहाण्याने सदर वाहने परस्पर विकणार्या त्रिकुटापैकी एकाला कोपरखैरणे पोलीसांनी अटक केली आंहे. वैभव अनंता कोळी (35) असे त्याचे नाव असून त्याने दोन साथीदाराच्या मदतीने परस्पर विकलेली 1 कोटी 36 लाख 45 हजार रुपये किमतीची 11 वाहने कोपरखैरणे पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच यातील इतर दोन आरोपींचा तपास सुरु आहे.
वैभव कोळी हा भाडेतत्वावर वाहने याने ओळखीच्या तर काही अनोळखी व्यक्तींकडून त्यांची वाहने भाडेतत्वावर लावण्यासाठी घेतली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी आप्या महागड्या कार त्याच्याकडे भाडेतत्वासाठी दिल्या होत्या. मात्र कोळी याने ती वाहने परस्पर विकली. तर काही वाहने त्याने साऊद कलदने व आशीष मेनन यांच्याकडे भाड्याने लावण्यासाठी दिल्या. मात्र त्यांनीही ती वाहने विकून अपहार केला. फसवणुक झालेल्या एकाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप तिदार यांच्या मागदर्शनाखाली उपनिरिक्षक संतोष चौधरी यांच्या पथकाने तांत्रिक तपास करुन वैभव कोळीला अटक केली. चौकशीत त्याने इतर 11 व्यक्तींची वाहने देखील भाडेतत्वावर लावण्यासाठी घेतल्याचे कबूल केले. तसेच त्याच्याकडून अपहार केलेली वेगवेगळी 1 कोटी 36 लाख 45 हजार रुपये किंमतीची एकूण 11 वाहने ओरिजनल कागदपत्रासह हस्तगत केली आहेत. या टोळीतील आणखी दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai