Breaking News
एकत्र येण्याचा सोहळा गोड, आठवींचा खोलतो मोड ॥
हास्यविनोद गप्पांचा मेळा, मैत्रिचे नाते घट्ट विनलेला |
आठवणीत राहील मित्रांनो तुम्हा मित्र-मैत्रिणींचा सहवास ॥
तुमच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण,
होता तो गेट-टुगेदरचा खास दिन|
येण मांझ कनफर्म नव्हतं त्यासाठी मित्रांनी खुप रिक्वेष्ट केली॥
अन व्हय-नाय, व्हय नाय करत सुटी माझी सॅक्शन झाली |
पोहोचलो शेवटी मुंबईत तिथ ट्राफीक होतं खूप ॥
यायच होत लवकर मला करत होतो ऑटो बुक |
कॉल केला मित्रानं, नको नको ऑटो होईल तुला लेट ॥
सजेस्ट केल त्यान, अरे जा तिथंच पलिकडे मेट्रो पकड थेट |
लवकर येशील उदया असा कॉल आला संदिप बिरामनेचा|
अन मित्रांनो खरच नाही कळल, कसा उजाडला दिवस 17 तारखेचा
मित्र-मैत्रीण माझे खास, जणुु सगे-सोयरे आप्तेष्ट भारी|
गडबड होती जायची त्यात पदस्पर्श त्यांचे लागले माझ्या दारी
अशा प्रकारे पुन्हा एकदा बसलो त्याच दहावीच्या वर्गात
अन आपोआपच गेलो ना त्या बालपणीच्या जगात |
शिंदे सर आले वर्गात, अहो काय त्यांचा मनमिळावूपणा |
अन तहसीलदार साहेबांनी माझ्या, आठवून दिला पुन्हा एकदा कणा
उस्फुर्त होते सर्वजण, कारण वेळ झाली रिसॉर्टवर निघायची|
अन सरपंचांनी आदेश दिला, लवकर जावुन आपापली सीट पकडायची
निघाला आमच्या गाडीचा ताफा, डौलामौलात आणि जोमात |
अहो नाद काय करता ‘गोल्डन बॅचचा’ गेले ना बघणारे कोमात|
ताफ्यात चालल्या होत्या खूप मोठ्या चढ़ा-ओढी|
अन शोभा वाढवायला होती लाल दिव्याची गाडी|
पोहोचलो होतो रिसोर्टच्या गेटवर, आता जाऊयात म्हटंल आत |
तेवढ्यात ओव्हरटेक करून आले संग्राम दादा, त्यांचा गाडी नंबर सात|
अहो काय ती एन्ट्री आणि काय तो राजेशाही थाट|
अन सगळेच आतुर झाले, पहात होते याच क्षणाची वाट|
काय तेे फटाके, कसले ते बार जणु दसरा-दिवाळी,
ते हवेत सोडलेले फुगे, कैमेरामेन आणि ड्रोनच आयोजन|
अन-सलाम तुमच्या कार्याला, कारण केल होत तुम्ही कडक नियोजन |
मुलींसाठी खेळात गिफ्ट होती पैठणी साडी|
अन आठवणीत राहील मित्रांनो माझ्या तहसिलदार साहेबाची, लाल दिव्याची गाडी|
सारथी होता गाडीचा माझा जिवलग मित्र सचिन मनमौजी|
अन विषय होता टॉपचा मित्रांनो, हरकुन गेला तुमचा मित्र फौजी |
21 वर्षानंतर पुन्हा एकदा दिसले चमकणारे तारे |
जुन्या आठवणी आणि गप्पा-गोष्ठींच्या रंग मैफिलीत बुडुन गेले सारे|
खंत होती एक मनात, भांडलो होतो सेक्रेटरी बरोबरी
सॉरी बोललो तिला दिसताक्षणी, अहो काय कमी होतय माफी मागितल्यावर |
बोलायच होत मित्रांनो खुप सार काही पण राहुनच गेलं |
व्यक्त झाले सर्वजण, सांगितली सर्वांनी आपले गाऱ्हाणं |
अन खास गणेश मित्रासाठी गायली वणव्याची कविता अजय भावानं|
अहो कष्ट करायला लाज कशाची, कष्टाच असत खणखणीत नाणं|
अन संतोष हिरवे यांनी वाजवल ना जबरदस्त गाण |
सरपंच,
सोहळा आपला सुरळीत व्हावा असा तुमचा होता मोटो|
पण वेळच कमी पडला त्यात काहीजनांचे राहिलेना काढायचे फोटो
घ्या आता मनावर पुन्हा एकदा तुम्ही |
अहो वेळात वेळ काढून पुन्हा येऊ सारे आम्ही |
आज मला आठवले दिवस सरुन गेलेले,
मैत्रीच्या आठवणी जागवत गेलेले पण आता असच भेटत रहायच गेट टुगेदरच्या निमित्ताने,
सुखः दुःख वाटत राहुयात आणि फक्त मैत्रीच नात जपूयात |
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील |
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवळत राहील |
कितीही दूर जरी गेलो तरी हे मैत्रीच नात अन् आहे तसच उद्या राहील
मित्रांनो आल माझ्या मनात ते मी उतरवल कागदावर |
चुकल असल काही तर नका घेऊ कोणी मनावर |
जगताप सरांच्या खेळात होती गर्ल ब्यूटी|
संपली माझी सुट्टी मित्रांनो आता करतो जॉईन ड्यूूटी|
आता करतो जॉईन ड्यूटी|
- शशिकांत साळेकर, फौजी
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai