Breaking News
उरण ः जासई व चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या वैष्णो लाँजिस्टीक पार्क या गोदामाला 15 जानेवारी रोजी भीषण आग लागल्याची घटना सकाळी 9-30 च्या सुमारास घडली. गोदामात ठेवण्यात आलेल्या अतिज्वलंशील केमिकलमुळे आग लागल्याचा अंदाज असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीत गोदामातील कामगार थोडक्यात बचावले असल्याची माहिती कामगारांनी दिली.
मागील दोन वर्षांपूर्वी जासई व चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील वैष्णो लाँजिस्टीक पार्क या मालाची व केमिकल ची हाताळणी करणाऱ्या गोदामात स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. या स्फोटात गोदामातील कामगारांना आपले जीव गमवावे लागले होते. त्याच वैष्णो लाँजिस्टीक पार्क या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला सोमवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी पुन्हा एकदा आग लागली. यावेळी कामगारांच्या सावधगिरीमुळे कामगार बालबाल बचावले आहेत. या घटनेची माहिती सिडको, जेएनपीए येथील अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. रसायन भरलेल्या एका कार्गो कंटेनरला लागलेल्या आगीत एक कार्गो आणि पोकलेन आदी मशिनरी आगीत भस्मसात झाली. अग्नीशमक दलाच्या जवानांनी 11 बंब आणि फोमच्या साहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. रसायनाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत .पंचनामे करून चौकशीचे काम सुरू करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai