Breaking News
उरण ः तालुक्यातील शेवा कोळीवाडा येथील जेएनपीटी प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांवर गेली 40 वर्षे अन्याय चालू आहे. त्यांच्या गावाचे विस्थापन करून कायदेशीर पुनर्वसन न करता, अनेक वर्षे या कोळी बांधव आणि भगिनींना संक्रमण शिबिरात ठेवण्यात आले. या अन्यायाविरोधात आणि रक्षाबंधन या विश्वासाचे सनाचे पवित्र दिवशी कोळी बांधवांनी मंजूर नकाशा नुसार सिंबॉलिक ताबा व भूखंड वाटपाचा कार्यक्रम सुरु केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कुदळ मारून व नारळ फोडून करण्यात आले.
अखंड संघर्ष, अंगावर खटले घेऊन, पुनर्वसनाच्या हक्कासाठी लढा देत अखेर 10.46 हेक्टर जागेस 17/11/2021 रोजी मंजुरी मिळाली. या मंजुरीस केंद्र सरकारची मान्यता मिळूनही जेएनपीटी प्रशासन, रायगड जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार हे शेतकरी बिगर शेतकरी यांचे 256 भूखंड नकाशा व भुखंड यादीला मंजूरी असताना सुध्दा वाटपास टाळाटाळ करीत आहेत.या अन्यायाविरोधात आणि रक्षाबंधन या विश्वासाचे सनाचे पवित्र दिवशी कोळी बांधवांनी मंजूर नकाशा नुसार सिंबॉलिक ताबा व भूखंड वाटपाचा कार्यक्रम सुरु केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सिध्दार्थ इंगळे, नंदकुमार पवार, रमेश कोळी व त्यांची पत्नी उज्वला कोळी यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी वकील सिद्धार्थ इंगले, नंदकुमार पवार, कोळी बांधवाचे सर्वेसर्वा रमेश कोळी, सुरेश कोळी,परमानंद कोळी, मंगेश कोळी, ऍड. विकास शिंदे तसेच सर्व समस्त कोळी बांधव व भगिनी उपस्थित होते. माझ्यावर हा मान सोपवल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. माझी सामाजिक जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य समजून, मी आपल्यासाठी सदैव कर्तव्यदक्ष राहीन. लढा अजून संपलेला नाही तो आता अधिक प्रखर झालेला आहे असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ इंगळे यांनी व्यक्त केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai