Breaking News
नवी मुंबई ः राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. तसेच दि. 3 जुलै, 2024 च्या शासन निर्णयान्वये त्यामध्ये अंशत: सुधारणा करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने व जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना सदर योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने आयुक्त, नवी मुंबई महापालिका यांच्या मार्गदर्शनाखाली 04 जुलै 2024 च्या आदेशान्वये समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे हे मुख्यालय स्तरावर नोडल अधिकारी तसेच समाजविकास विभागाचे सहा.आयुक्त प्रबोधन मवाडे हे सहा.नोडल अधिकारी असतील. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियंत्रणाखाली विभाग कार्यालयातील कर्मचारी हे लाभार्थ्यांकडून प्राप्त होणारे अर्ज स्विकृती / तपासणी / पोर्टलवर अपलोड करणे, ऑफलाईन प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या नोंदी ठेवून त्याची पोहोच देणे इ. कार्यवाही करतील.
समाजविकास विभागातील समाजसेवक हे विभाग कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या समुह संघटकांवर नियंत्रण ठेवणे व योजनेसंदर्भात आवश्यक मार्गदर्शन करतील. तसेच समुह संघटक हे पात्र महिलांना सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी जनजागृती करणार आहेत. तरी, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात राहणाऱ्या पात्र महिला लाभार्थ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व विभाग कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण नोंदणी कक्ष” येथे जाऊन सदर योजनेकरीता आपला अर्ज दाखल करुन सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai