Breaking News
नवी मुंबई ः पालिका कार्यक्षेत्रात पर्यावरण संरक्षण, आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता या विषयांवर अधिक भर देत विविध गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहित करण्याचा उद्देश नजरेसमोर ठेवून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. महापालिका क्षेत्र स्तरावर ‘नवी मुंबई पालिका पर्यावरणपूरक व प्लास्टीकमुक्त सार्वजनिक गणेशदर्शन स्पर्धा 2025-26 चे आयोजन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या तसेच स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या व नवी मुंबई महापालिकेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नमुंमपामार्फत नेमण्यात आलेले परीक्षक उत्सव स्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हिडिओग्राफी व पूरक कागदपत्रे घेऊन त्यानुसार परीक्षण करुन स्पर्धेच्या मूल्यमापन निकषानुसार 10 सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची निवड करतील. या मंडळांना रोख रक्कमेसोबत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कमेचे स्वरुप पुढीलप्रमाणे असेल - प्रथम पारितोषक रु. 75,000 व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषक रु. 71,000 व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, तृतीय पारितोषक रु. 61,000 व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, चतुर्थ पारितोषिक रु. 51,000 व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, पाचवे पारितोषिक रु. 41,000 व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, सहावे पारितोषक रु. 31,000 व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, सातवे पारितोषिक रु. 25,000 व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, आठवे पारितोषिक रु. 21,000 व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, नववे पारितोषिक रु. 11,000 व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, दहावे पारितोषिक रु. 10,000 व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र.
तरी सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी गुगल फॉर्म भरणे गरजेचे असून त्याकरिता लिंक हीींंीि://षेीाी.सश्रश/4झी9हनींठ7दळचर्सीड1अ वर विहीत नमुन्यातील अर्ज भरुन दि. 31/08/2025 पर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे असे नवी मुंबई पालिकेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai