Breaking News
प्रितम म्हात्रे व राजू मुंबईकर यांची सामाजिक बांधिलकी
पनवेल : दुर्गम, डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या आदिवासीं बांधवांच्या घरची बेताची परिस्थिती आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत त्यांच्या रोजी-रोजगाराची साधनंच उध्वस्त झाली आहेत. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेमार्फत रानसई व वेश्वी आदिवासी पाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
राजकारण आणि समाजकारण यांची योग्य ती सांगड घालत आपल्या सेवाभावी स्वभावाने प्रितम म्हात्रे सामाजिक कार्याचा वसा जपत आहेत. तसेच पर्यावरण प्रेमी राजू मुंबईकर हेही आपले सामाजिक दायित्प जपत नेहमीच गरजवंतासाठी आधार बनत असतात. सतत पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका सर्वानाच बसला आहे. याचा जास्त त्रास सहन करावा लागला तो दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना. हातावरचे पोट असणाऱ्या या बांधवांना या नैसर्गिक आपत्तीची जास्त झळ बसल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून उरण-रानसई येथील चांदयली आदिवासींवाडी, भुऱ्याचीवाडी, मार्गाचीवाडी, बंगल्याचीवाडी, सागाचीवाडी आणि वेश्वी या आदिवासी वाड्यांवरील बांधवांना तांदूळ, गव्हाच पीठ, साखर, डाळ, मीठ, चहापावडर, साबण, बिस्किट या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच महिला भगिनींकरिता साड्यांचे वाटप देखील करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai