Breaking News
नवी मुंबई : पनवेलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नवीन खाजगी दुचाकी वाहनांसाठी MH46CN या नवीन मालिका लवकरच सुरु होत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी कळविले आहे.
या मालिकेतील आकर्षक/अनाकर्षक नोंदणी क्रमांक राखीव करायचे असल्यास नागरिकांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत पनवेलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 57अ नुसार विहित केलेले आकर्षक नोंदणी क्रमांक व त्यासाठीचे शुल्क याबाबतची सविस्तर माहिती, पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयचे प्रादेशिक परिवहन अधिकारीयांच्याकडे उपलब्ध आहे. एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास उक्त नमूद तरतूदीनुसार नोंदणी क्रमांकासाठी जाहीर लिलाव केला जाईल. पनवेल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उरण, पनवेल, कर्जत व खालापूर तालुक्यातील नागरिकांना यासाठी आवाहन केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai