Breaking News
421 कोटींच्या निधीला सर्वसाधारण सभेत मंजूरी
पनवेल ः पनवेल महापालिकेत नूकत्याच गत शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शहर आणि उपनगरांमध्ये रस्ते बांधणी आणि कळंबोली येथील धारणतलावातील गाळ काढणे या धारणतलावामध्ये पंपहाऊस नव्याने कार्यान्वित करणे, धारण तलावाचे सुशोभिकरण करणे अशा विविध कामांसाठी 421 कोटी रुपयांच्या ठरावांना मंजूरी दिली आहे. यामधील अनेक विकासकामे सिडको वसाहतींमध्ये होत असून सिडको मंडळाने बांधलेल्या मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण महापालिका प्रशासन करत आहे. यामुळे खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल यांसारख्या उपनगरांमध्ये काँक्रीटचे रस्ते बांधणीचा श्रीगणेशा महापालिकेने केल्याची चर्चा आहे.
पनवेल महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकांच्या हाती आहे. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन पालिकेची सर्वसाधारण सभेतून नागरिकांच्या हिताचे महत्वाचे निर्णय घेत आहेत. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदेश्वर, तळोजा, नावडे या विविध वसाहतींचे निर्माण सिडको महामंडळाने केले असून यांतील अनेक वसाहतीं 30 वर्षांपुर्वी उभारल्या गेल्या आहेत. सिडको मंडळाने मागील अनेक वर्षे या वसाहतींमध्ये क़ाँक्रीटचे रस्ते बांधले नव्हते. महापालिकेने वाढते नागरीकरण, वाहनांचा ताण ध्यानात घेऊन भविष्यात खड्डे समस्या पुढील काही वर्षांसाठी तरी मोडीत काढण्यासाठी रस्ते काँक्रीटचे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल असे आश्वास पनवेल महापालिका आयुक्त देशमुख यांनी लोकसत्ता ‘शहरभान' या कार्यक्रमात नागरिकांना दिले होते. दिड आठवडा उलटताच याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पालिका परिसरातील उपनगरांमध्ये काँक्रीट व डांबरी रस्ते बांधण्यासोबत कळंबोली येथील धारण तलावातील गाळ काढून तिथे पंपहाऊस कार्यान्वित करण्याचा निर्णय आयुक्त देशमुख यांनी घेतला. सर्वसाधारण सभेतील मंजूरीनंतर निविदा प्रक्रीयेपूर्वी तांत्रिक मंजूरी मिळविण्याची प्रक्रीया पनवेल महापालिकेत सूरु झाली आहे. येत्या दोन आर्थिक वर्षात सिडको वसाहतींचे मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण महापालिका करणार आहे.
कळंबोली उपनगरामध्ये शीव पनवेल महामार्गावरील सेक्टर 1 येथील शिवसेना शाखा ते रोडपाली येथील अविदा हॉटेलपर्यंतचा संपुर्ण रस्ता काँक्रीटीकरण, करावली चौक ते अग्निशमन दल इथपर्यंत काँक्रीटीकऱण, 80 कोटी 88 लाख रुपये, तसेच केएलई महाविद्यालय (कामोठे बसथांबा) ते रोडपाली तलाव या रस्त्याचे डांबरीकरण 19 कोटी 96 लाख रुपये.
कळंबोली उपनगरातील एलआयजी बैठ्या वसाहतीलगत धारणतलावातील गाळ काढणे, या तलावाजवळ पंपहाऊस उभारुन तो कार्यान्वित करणे यासाठी 116 कोटी 60 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यानंतर या तलावाचे सुशोभिकरण करण्याचे काम पालिका हाती घेणार आहे. तलावाचे काम कऱणा-या संबंधित एजन्सीने काम करण्याअगोदर पर्यावरण विषयक मंजू-या विविध सरकारी कार्यालयातून मिळविणे त्या एजन्सीची जबाबदारी असणार आहे. कांदळवन समिती व इतर पर्यावरण विषयक मंजू-या आतापर्यंत सिडको मंडळाला मिळविता न आल्याने हे काम मागील 15 वर्षांपासून रखडले होते.
नवीन पनवेल उपनगरांतील एचडीएफसी सर्कल आणि आदई सर्कल या दोन्ही सर्कलचे काँक्रीटीकरणासाठी 6 कोटी 50 लाख
पनवेल शहरातील महापालिकेचे नवीन स्वराज्य पालिका मुख्यालयासमोरील मार्ग ते जेएनपीटी मार्गाला जोडणा-या रस्त्यांचे काँक्रीटीकरणासाठी 46 कोटी 43 लाख रुपये पालिका खर्च करणार आहे. पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्ग (न्यायाधीस निवास ठाणा नाका) ते मित्रानंद सोसायटी काँक्रीटीकरण करण्यासाठी 9 कोटी 46 लाख रुपये
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai