Breaking News
स्वयं अर्थसहाय्य तत्त्वावर मंजुरी
नवी मुंबई ः महापालिकेच्या 9 शाळांमध्ये माध्यमिकचे वर्ग सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे आता पालिकेच्या शाळेतही नववी आणि दहावीचे वर्ग सुरू होणार आहे. त्याचबरोबर या शाळांना स्वयं अर्थसहाय्य तत्त्वावर मंजुरी दिली आहे. परिणामी या शाळांच्या खर्चासाठी राज्य सरकारकडून कोणतेही अनुदान मिळणार नाही. त्यामुळे या शाळांचा खर्च भागविण्यासाठी पालिकेला स्वतःच निधी द्यावा लागणार आहे. यामध्ये 6 इंग्रजी, 1 हिंदी/मराठी/इंग्रजी तर 3 मराठी माध्यमिक शाळांचा समावेश आहे.
नवी मुंबई पालिकेच्याशाळांमध्ये सुमारे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या प्राथमिक शाळांमधून आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पालिकेच्या अथवा खासगी माध्यमिक शाळांमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा लागतो. मात्र नजीकच्या परिसरात पालिकेची माध्यमिक शाळा उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्यांजवळ खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याखेरीज दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेची फी परवडणारी नसते.गरीब विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळांचा आधार असतो. त्यामुळे पालिकेच्या शाळांमध्येही माध्यमिक शिक्षण सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार ज्या भागात पालिकेची माध्यमिक शिक्षणासाठी शाळा जवळ नाही, अशा भागात प्राथमिक शाळेसोबत माध्यमिकचे वर्ग सुरू करण्याची परवानगी पालिकेकडून राज्य सरकारकडे मागण्यात आली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस