Breaking News
सह निबंधकावर निलंबनाची कारवाई
नवी मुंबई ः गेले अनेक महिन्यांपासून अनधिकृत बांधकामे तसेच गावठाण परिसरातील बांधकामांची नोंदणी बंद केली आहे. परंतु, शासकीय दस्त म्हणून दुय्यम निबंधकांकडे मुद्रांक नोंदणी शुल्क भरून हे दस्त नोंदणी केल्यानंतर ही मालमत्ता कायदेशीर झाल्याचे काही विकसकांकडून भासवले जाते. कोपरखैरणे येथील सह दुय्यम निबंधक राजकुमार दहिफळे यांनी अनधिकृत बांधकामांमधील काही मालमत्तेचे दस्त केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर महसूल विभागाचे अवर सचिव विनायक लवटे यांनी चौकशी अंती निलंबनाची कार्यवाही केली आहे.
नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांमधील मालमत्ता (घर, गाळे) विकण्यासाठी शासकीय दस्त म्हणून दुय्यम निबंधकांकडे मुद्रांक नोंदणी शुल्क भरून हे दस्त नोंदणी केल्यानंतर ही मालमत्ता कायदेशीर झाल्याचे काही विकसकांकडून भासवले जाते. असे गैरव्यवहार टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि सिडको मंडळाने महाराष्ट्र प्राधिकरण व नगररचना अधिनियम 1966 अन्वये विना भोगवटा असलेल्या इमारतींच्या मालमत्तांचे मुद्रांक घेणे मनाई केल्यानंतर सुद्धा संबंधित दस्त नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 8 येथे नोंदणी केल्याचे समोर आले आहे. कोपरखैरणे येथील दुय्यम निबंधक कार्यालया केलेल्या तपासणीमध्ये अनधिकृत बांधकामांमधील मालमत्तेचे दस्त राजकुमार याने 10 दिवसात 842 दस्त नोंदणी केल्याचे उजेडात आले. त्यांच्यावर महसूल विभागाचे अवर सचिव विनायक लवटे यांनी चौकशी अंती निलंबनाची कार्यवाही केली आहे.
बेकायदा बांधकामे अधिकृत असल्याचे भा)सविण्यासाठी स्थानिक विकासक चिरीमिरीचा अवलंब करून सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी गाठून त्यांच्या मार्फत या दस्तांची नोंदणी करून त्यावरील मुद्रांक शुल्क शासनाच्या तिजोरीत भरून या सदनिका व गाळे कायदेशीर असल्याचे भासवतात. यामुळे सर्वसामान्य सदनिकाधारक लुबाडले जात आहे. बँकांचे गृहकर्ज घेऊन अशा बांधकामांमुळे सदनिका खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी संबंधित इमारतींना स्थानिक स्वराज्य संस्थेची नोटीस आल्यावर हा सर्व प्रकार उजेडात येतो. सह जिल्हानिबंधक वर्ग 1 या कार्यालयाला कौपरखैरणेतील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील गैरकारभाराची तक्रार प्राप्त झाली होती. नोंदणी कोकण विभागाचे उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक राहुल मुंडके यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 यांना यासंदर्भात कोपरखैरणे येथील सह निबंधक कार्यालय क्रमांक 8 मधील दस्तांची तपासणी करून त्यासंदर्भात अहवाल दिल्यानंतर अवर सचिव विनायक लवटे यांनी राजकुमार दहिफळे यांचे निलंबन करत विभागीय चौकशीचे आदेश दिले. या संदर्भात कोकण विभागिय नोंदणी उपमहानिरीक्षक व मुंद्राक उपनियंत्रक यांनी 22 ऑगस्ट रोजी कोपरेखैऱणे कार्यालयाकडे अनधिकृत इमारतीमधील प्रथम खरेदीचे दस्त मनाईचे आदेश असताना 10 दिवसात 842 अनधिकृत मालमत्तांच्या दस्तांची नोंदणी केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात जानेवारी ते मे या दरम्यान दर महिन्याला 700 ते 835 एवढे दस्त नोंदणी केले जात होते. मात्र राजकुमार यांनी अतितातडीने दर्शवत जून महिन्यात 1513 दस्त नोंदणी केल्याने संशय बळावला. याच दस्तांची तपासणी केल्यावर 10 दिवसात 842 दस्त आढळले. अवर सचिव लवटे यांनी राजकुमार यांचे निलंबनानंतर पुढील 15 दिवसात त्यांची विभागीय चौकशी करून त्याचा अहवाल शासनाला देण्याचे आदेश दिले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai