Breaking News
जेएनपीए आणि आयसीपीपी यांच्यात सामंजस्य करार
उरण : जेएनपीए बंदरातील ‘न्हावा-शेवा डिस्ट्रीब्यूशन टर्मिनल’ येथे ‘एनएसएफटी’ या खासगी बंदराच्या विद्युत कंटेनर वाहनांच्या नवीन ताफ्याचे उद्घाटन केंद्रीय जहाज बांधणी, जलवाहतूक व बंदर मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. ‘सागरसमृद्धी 2030’ व ‘सागर अमृतकाल 2047’ पर्यंत भारत जहाज बांधणी क्षेत्रात जगातील अग्रेसर देश बनेल, असा विश्वास सोनोवाल यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे नव्या विद्युत वाहनांमुळे लॉजिस्टिक व बंदराचा कारभार अधिक सक्षम होणार आहे.
जेएनपीएमधील विद्युत ट्रकच्या (ईव्ही) नवीन ताफ्याचे लोकार्पण करताना ‘एमओपीएसडब्ल्यू’चे संयुक्त सचिव आर. लक्ष्मणन, आ. महेश बालदी, जेएनपीएचे अध्यक्ष आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ, जेएम बक्षी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव कोटक आदी उपस्थित होते. आधुनिक विद्युत वाहनांच्या माध्यमातून मालवाहतूक मार्गांच्या कार्यक्षमतेत वाढ करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले आहे. जलमार्गाशिवाय मानवी विकास अशक्य आहे. सागर, नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतल्याने कार्बन उत्सर्जन कमी करता येईल असे मत मंत्री सोनोवाल यांनी व्यक्त केले. यावेळी जेएनपीए आणि दिल्ली येथील अशोका विद्यापीठाच्या आयझॅक सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी (आयसीपीपी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
जेएनपीएने लॉजिस्टिक वाहनांचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या विद्युत वाहनांमुळे लॉजिस्टिक व बंदराचा कारभार अधिक सक्षम होईल. जेएनपीएने जागतिक स्तरावरील प्रमुख 25 बंदरांमध्ये स्थान मिळवले आहे. तर 1 कोटी कंटेनर हाताळणीचाही विक्रम केला आहे. त्याचप्रमाणे सेझमधील महत्त्वाचे प्रकल्प पुढे नेणे, डिजिटलायझेशन आणि हरित ऊर्जा आदी उपक्रमही राबविण्यात येत आहेत. भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदराचे विश्वस्त म्हणून आर्थिक प्रगती आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल साधणाऱ्या नवोपक्रमांना स्वीकारणे ही आमची जबाबदारी आहे, असे मत जेएनपीएचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ यांनी व्यक्त केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai