सानपाडा पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 26, 2025
- 138
राज्यातील सर्वात सुसज्ज आणि अद्ययावत पोलीस ठाणे असणार
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सानपाडा पोलीस ठाण्याच्या नवीन सर्व सेवासुविधांयुक्त सुसज्ज भव्य इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. अनेक वर्षांपासून या इमारतीची प्रतीक्षा केली जात होती. आता नवीन वास्तू मधून कायदा सुव्यवस्थेचा गाडा हाकला जाणार आहे. तसेच अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या कोकण विभागासाठी सानपाडा पोलिस ठाण्याच्या इमारतीमध्ये जागा देण्यात आली असून त्याचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
सानपाडा येथे नव्याने उभारलेल्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पाडले. यावेळी वन मंत्री गणेश नाईक, स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, सह अनेक राजकीय नेते तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आयुक्त मिलिंद भारंभे सह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. सानपाडा पोलीस ठाण्यातील इमारत हि केवळ नवी मुंबईतील नव्हे तर राज्यातील सर्वात सुसज्ज पोलीस ठाणे असल्याचा दावा नवी मुंबई पोलिसांनी केला आहे. या वेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील वाशी, पनवेल आणि सीबीडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वाटप केले गेले. या शिवाय ई-संवाद ऑनलाईन सेवा, सायबर आर्थिक गुन्हे तपास कक्षाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण पोलीस ठाण्याची पाहणी करून माहिती उपस्थित अधिकाऱ्याकडून घेतली.
सुमारे 10 कोटी रुपयांचा खर्च सानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी करण्यात आलेला आहे. या इमारतीमुळे नवी मुंबई शहराची शान वाढवणारी अजून एक दिमाखदार वास्तू उभी राहिली आहे. महाराष्ठ्र हौसिंग कार्पोरेशन यांनी हि इमारत बांधली आहे. या ठिकाणी पोलिसांना लागणाऱ्या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सायबर गुन्हे संदर्भात अधिक वेगवान तपास होण्यातही स्वतंत्र कक्ष उभे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांनी आखलेल्या 100 दिवसांचा कार्यक्रमात तीन पोलीस ठाणे यांनी बाजी मारली आहे. यात स्वच्छता तक्रारदारांना सेवा असे अनेक मुद्दे आहेत. त्यासाठी आयएसओ मानांकन देण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात असणाऱ्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्याचा मोठा भाग सानपाडा पोलीस ठाणे अंतर्गत येतो. सिडकोने सानपाडा पामबीच येथील मोराज सर्कल समोर सानपाडा पोलीस स्टेशनसाठी सुमारे 18 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेल्या या ठाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे नवी मुंबईतील पहिले सौरऊर्जेवर चालणारे पोलीस ठाणे येत्या काळात ठरणार आहे. याचे बहुतांश काम पूर्णत्वास येत आहे. चार मजली या इमारतीत 40 हून अधिक खोल्या असून सुरक्षिततेसाठी खास लॉकरसुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वागत कक्ष, कर्मचारी विश्रांती गृह, स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष, लॉकअप रूम, सुसज्ज पार्किंग,कोठडी, बैठक शिवाय सायबर आर्थिक गुन्हे विभाग तसेच सर्व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असून तक्रारदार आणि भेट घेणाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
- अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
उप अधीक्षक रामचंद्र मोहिते यांच्यावर कोकण परिक्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली असून मुंबई वगळता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे कार्यक्षेत्र असणार आहे. यासाठी जवळपास तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा त्यांना देण्यात आला आहे. - ई-संवाद प्रणाली सुरु
नागरिकांना उपयुक्त ठरणारा ई-संवाद हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यात पोलीस ठाण्यात नागरिक तक्रारदारांना येण्याची गरज पडू नये त्या दृष्टीकोनातून घर बसल्या व्हिडीओ कॉलिंद्वारे स्टेटमेंट ई-संवाद प्रणालीच्या माध्यमातून नोंदविता येणार आहे. - साय-फाय युनिट
देशभरासह नवी मुंबईत वाढते सायबर व आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्या अंतर्गत साय-फाय युनिट तयार करण्यात आले आहेत. या युनिटमध्य विशेषे अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात करण्यात येणार आहे. या विशेष कक्षाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai