मनोरुग्ण तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 05, 2021
- 558
नवी मुंबई ः वाशी सेक्टर 17 येथे जय जवान इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर 20 वर्षीय तरुणी आत्महत्या करण्यासाठी चढली होती. याची माहिती वाशी पोलिसांना मिळताच पोलिसांनी अग्नीशमन दलाच्या मदतीने या मुलीला वाचविण्यात आले. ही तरुणी मनोरुग्ण असून यापूर्वी देखील तिने असे प्रयत्न केले आहेत.
या तरुणीची तब्बल एक तास समजूत काढण्यात आली. तरी देखील ही तरुणी ऐकण्यास तयार नव्हती. त्यानंतर महिला पोलीस मानसी लाड यांनी तिला बोलण्यात अडकवून ठेवले. पोलीस हवालदार दत्तात्रय रेंगटे आणि अमृत साळी यांनी शिताफीने या तरुणीला पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
ही तरुणी याच इमारतीमध्ये आपल्या आजीसोबत राहते. तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तिने हा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तरुणीने यापूर्वी पण आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिच्या मनोरुग्ण अवस्थेमुळे तिच्या आईने यापूर्वी आत्महत्या केलेली आहे. या धक्क्यामुळे वडील देखील वाशीतच तिच्यापासून वेगळे राहत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai