राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 09, 2018
- 619
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक होणार असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे हरिवंश नारायण आणि विरोधकांनी पाठिंबा दिलेले काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद यांच्यात ही लढत रंगणार आहे. सकाळी 11 वाजता मतदानाला सुरूवात होईल. काँग्रेसचे के पी जे कुरियन 1 जुलैला सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त आहे. सध्या राज्यसभेत 244 सदस्य असून बहुमतासाठी 123 मतांची गरज आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी निवडणुकीत विजय मिळेल असा दावा केला आहे.
भाजपने राज्यसभेच्या सर्व खासदारांना निवडणुकीसाठी उपस्थित राहण्याचा आणि एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हिप जारी केला आहे.एनडीएचे उमेदवार हरिवंश यांनी राज्यसभा उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल करताना एनडीएचे सर्व नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेतेही यावेली उपस्थित होते. एनडीएच्या हरिवंश यांचं पारड सध्या तरी जड आहे. राज्यसभेत एनडीएचे संख्याबळ 116 आहे. बीजेडीने पाठिंबा दिल्यानंतर ते 123 पर्यंत जाईल. पण एनडीएच्या उमेदवाराला 125 ते 128 मते मिळावी यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांकडे 118 जणांचा पाठिंबा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai