मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 29, 2020
- 731
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंह 1988 च्या आयपीएस बॅचचे आधिकारी आहेत. याआधी परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. परमबीर सिंह यांच्या नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी बिपीन के सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पमबीर सिंह यांच्यासह सदानंद दाते, रश्मी शुक्ला, हेमंत नगराळे, के. व्यंकटेशम यांची नावं मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत आघाडीवर होती. संजय बर्वे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. मात्र त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती, ही मुदतवाढ 30 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा तीन महिने मुदत वाढवून देण्यात आली. ही मुदतवाढ 29 फेब्रुवारी रोजी संपत असल्याने रिक्त झालेल्या आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परमबीर सिंह यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. परमबीर सिंह यांनी चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याचं पोलीस अधीक्षकपद सांभाळलं आहे. याशिवाय एटीएसचे डेप्युटी आयजीही होते. परमबीर सिंह यांनी यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्तपद सांभाळलं होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai