मुंबईत पाणीकपात
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 02, 2019
- 877
मुंबई ः महापालिकेच्या पिसे उदंचन केंद्रामध्ये न्यूमॅटिक गेट सिस्टीम’ची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामूळे मुंबईत 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळात 10 टक्के पाणी कपातीसह कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे आवश्यक पाण्याची अतिरिक्त साठवण करून ठेवावी असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
दुरूस्तीच्या कामामुळे पाणीकपात करण्यात येत असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाने कळवले आहे. या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावातील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. मात्र पाणीपुरवठा यंत्रणेतील दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांत अनेकदा पाणीकपात करावी लागली आहे. या वेळी ही पाणीकपात आठवडाभर राहणार असल्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
गेल्यावर्षी कमी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यात 10 टक्के पाणी कपात करण्यात आले होते. मात्र यंदा पुरेसा पाऊस पडल्यामुळे पाण्याचासाठा पुरेसा झाला असून मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7 तलाव पूर्ण भरले आहेत. असे असले तरीही पिसे उदंचन केंद्रामध्ये न्यूमॅटिक गेट सिस्टीम’ची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतल्यामुळे मुंबईकरांना पुढील सात दिवस पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai