नरेंद्र मोदींची शरद पवारांना एनडीएत येण्याची ऑफर
- by Aajchi Navi Mumbai
- May 10, 2024
- 324
मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदी यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटावर टीका केली. पवार यांच्या काँग्रेसमध्ये सामिल होण्याच्या विधानावर पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना थेट एनडीएत येण्याची ऑफर दिली. मात्र ती पवार यांनी धुडकावून लावत मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला.
लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकारणात चर्चांना उधाण आले. यानंतर शरद पवारांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य करत थेट शरद पवारांनाच एनडीएमध्ये येण्याची मोठी ऑफर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदी यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटावर टीका केली. “नकली शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा करते. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना जवळून पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आज किती दु:ख होत असेल, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. यानंतर त्यांनी शरद पवारांच्या विधानावर भाष्य केले.
- शरद पवार काय म्हणाले ?
आज देशात संसदीय लोकशाही पद्धती ही मोदींमुळे संकटात आली आहे. ज्या व्यक्तीचा, धोरणाचा, पक्षाच्या विचारधारेचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही, असा समज लोकांमध्ये पक्का झालेला असेल, त्यांच्यासोबत व्यक्तीगत सोडा, राजकीय स्तरावर मी कधीच जाणार नाही.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai