राज्य ग्रीन झोन होण्यासाठी प्रयत्न करा अंमलबजावणीत कुचराई नको ः
- by Aajchi Navi Mumbai
- May 08, 2020
- 778
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थितीही ढासळली आहे. अर्थचक्र सुरु राहण्यासाठी राज्यात झोननुसार शिथिलता आणली आहे. पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकार्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा. मात्र अंमलबजावणीत कुचराई करू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. थोडी शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचे काही शहरांमधील दृश्य गंभीर होते. पोलीस आणि प्रशासनाने गर्दीही होणार नाही आणि सूरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस हे ज्या पद्धतीने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत, त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. मात्र मला येणार्या काही दिवसांत ठोस रिझल्ट दिसला पाहिजे. लॉकडाऊन करणे सोपे होते, पण आता त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरु झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाऊनचे योग्य पालन होत नाही, अशा तक्रारी येत आहेत. मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करत आहात, पण मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग नको ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आपण उद्योग-व्यवसाय काही प्रमाणात सुरु केले. मात्र याठिकाणी रेड झोनमधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये, ही काळजी घ्यावी लागेल. लक्षणे दिसत नसल्याने अनेक व्यक्ती या कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हेही आपल्याला पाहावे लागेल. काही वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांना संसर्ग झाला आहे, हे चिंता वाढवणारे आहे. घाई गर्दीने आपल्याला काहीही करायचे नाही. आत्तापर्यंत आर्थिक आघाडीवर जे नुकसान व्हायचे ते होतेच आहे. पण आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली ही साथ आता कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: रोखून पुढील नुकसान होऊ न देणेच महत्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळूनच होईल, हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai