‘लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार’
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 26, 2020
- 691
दक्षता जनजागृती सप्ताह-2020; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई :‘लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार’ असा ध्यास असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दि. 27 ऑक्टोबर 2020 ते 02 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह-2020’ साजरा करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा सप्ताह संपूर्ण देशभर साजरा करण्यात येत आहे. सुजाण नागरिकांनी तसेच अन्य कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, मुंबई, येथे संपर्क साधावा, असे आवाहन या सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईचे अपर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी केले आहे.
भ्रष्टाचार हा विकास कामातील सर्वात मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम केवळ आठवडाभर न राबविता नियमितपणे राबविले गेले पाहिजे. याकामी खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि सुजाण नागरिक मोठी मदत करु शकतात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai