आदित्य ठाकरेंपाठोपाठ रश्मी ठाकरेही कोरोना पॉझिटिव्ह
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2021
- 561
आदित्य ठाकरेंपाठोपाठ रश्मी ठाकरेही कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई ः काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. रश्मी ठाकरे यांनी 11 मार्चला कोवॅक्सिन लस घेतली होती. रश्मी ठाकरे वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन झाल्या आहेत.
20 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्वीट करून ही माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसेच कोरोना चाचणी करावी, असे आवाहन केले होते. मात्र आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान यापूर्वी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, चंद्रकांत खैरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातच कोरोनाने शिरकाव केला आहे. आधी आदित्य ठाकरे आणि आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांना कोरोना झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत गेल्या वर्षी मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या तीन दिवसांत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी, 20 मार्च रोजी 2 हजार 982 रुग्ण आढळून आले होते. तर रविवारी तब्बल 3,775 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.
मुंबईतील हे विभाग आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे, या विभागात महापालिकेकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai