दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरीला
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 28
चोरी करणाऱ्या इसमांवर कारवाई
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने पालिका क्षेत्रात रस्त्यांवर 35 हजारहून अधिक दिवाबत्तीचे खांब बसविण्यात आले असून त्यामध्ये वाशी लिंक रोड तसेच ठाणे बेलापूर महामार्गावरील दिवाबत्तीच्या खांबामधील तांब्याची तार चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. ठाणे बेलापूर रोड वरील कोकीलाबेन हॉस्पिटलजवळ दुभाजकामधील दिवाबत्तीच्या खांबांवरील तांब्याची तार दोन इसम काढत असल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले. या चोरी करणाऱ्या माणसांमधील एक व्यक्ती पळून गेला व एका व्यक्तीस चोरी केलेल्या 48 मीटर तांब्याच्या तारेसह ताब्यात घेण्यात आले. त्याची एफआयआर तक्रार तुर्भे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे.
महापालिका विद्युत विभागाच्या वतीने दिवाबत्तीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी विभागवार एजन्सीजची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत दिवसातून दोन ते तीन वेळा दिवाबत्तीच्या खांबांची एजन्सीच्या कामगारांकडून पाहणी करण्यात येत असते. यामध्ये सायन पनवेल महामार्गावर वाशी टोलनाक्यापुढे वाशी गावाजवळचा भाग तसेच बेलापूर उड्डाणपूलाजवळील भाग तसेच ठाणे बेलापूर मार्गावरील काही भाग येथील दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरीला गेल्याची बाब नमुंमपा विद्युत विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या भागात अधिक सतर्कता बाळगण्यात आली. त्याबाबत वाशी पोलीस ठाण्यात 10 दिवसापूर्वी एनसी तक्रारही नोंदविण्यात आली होती. यामध्ये 27 ऑक्टोबर रोजी सायं. 5.30 च्या सुमारास ठाणे बेलापूर रोड वरील कोकीलाबेन हॉस्पिटलजवळ दुभाजकामधील दिवाबत्तीच्या खांबांवरील तांब्याची तार दोन इसम काढत असल्याचे या भागातील दिवाबत्तीची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या मे. चैतन्य इलेक्ट्रिकल या एजन्सीच्या कामगारांच्या निदर्शनास आले. या चोरी करणाऱ्या माणसांमधील एक व्यक्ती पळून गेला व एका व्यक्तीस चोरी केलेल्या 48 मीटर तांब्याच्या तारेसह ताब्यात घेण्यात आले. त्याची एफआयआर तक्रार मे. चैतन्य इलेक्ट्रिकल यांच्यामार्फत तुर्भे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे.
एका दिवाबत्तीच्या खांबामध्ये साधारणत: 48 मीटर लांब तांब्याची तार वापरली जाते. अशाप्रकारच्या 60 दिवाबत्ती खांबांमधील साधारणत: 2880 मीटर लांबीची तार चोरीला गेल्याचे पाहणीअंती निदर्शनास आले आहे. अशा प्रकारच्या चोरीमुळे या भागातील दिवाबत्तीवर परिणाम होत असून पथदिवे सुरु नसल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. या बाबीकडे गांभिर्याने लक्ष देत शहर अभियंता शिरीष आरदवाड व कार्यकारी अभियंता प्रविण गाडे यांच्या नियंत्रणाखाली महापालिका विद्युत अभियंते व देखभाल दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीचे कर्मचारी यांचेमार्फत अधिक काटेकोरपणे दक्षता घेण्यात आली. यामुळे दिवाबत्तीच्या खांबांमधील तांब्याची तार चोरी करतांना पकडलेल्या व्यक्तीस तुर्भे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai