इलेक्ट्रिक वाहनांसाठी 8 चार्जींग स्टेशन प्रस्तावित फोटो
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 24
नवी मुंबई ः प्रदूषण नियंत्रणावर भर देत पर्यावरणशील शहर म्हणून नवी मुंबई अग्रभागी असावे यादृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांकरिता पुरेशा प्रमाणात चार्जींग स्टेशन्स उपलब्ध करून देण्याकडे पालिकेकडून विशेष लक्ष दिले जात आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात परिमंडळ 1 साठी 4 चार्जिंग स्टेशना तसेच परिमंडळ 2 साठी 4 चार्जिंग स्टेशन असे एकूण 8 चार्जिंग स्टेशन म्हणजेच 48 चार्जिंग पॉईंटस उभारण्यात येत आहेत. जागेच्या उपलब्धतेप्रमाणे नियुक्त एजन्सीला ईव्हीसीएस उभारण्याकरिता जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पालिकेच्या वतीने विविध पर्यावरणपूरक बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांकरिता पुरेशा प्रमाणात चार्जींग स्टेशन्स उपलब्ध करून देण्याकडे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांकरिता (ई व्ही) चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी किमान 70 चौ.मी. इतकी जागा आवश्यक असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रस्त्यालगतच्या उपयुक्त जागा अर्थात ले बे, मॉल्स, विभाग कार्यालये, महापालिका मुख्यालय, मंगल कार्यालये, उद्याने, वाहनतळे अशा गर्दीच्या जागांलगत तसेच महानगरपालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार शहरामध्ये 1 चौ.कि.मी. ग्रीडचा क्लस्टर प्रस्तावित असून त्यामध्ये 6 इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जींग स्टेशन प्रस्तावित आहेत. सध्या जागेची उपलब्धता लक्षात घेता एका क्लस्टरमध्ये 5 ईव्हीसीएस प्रस्तावित आहेत. अशाप्रकारे एकुण 24 ईव्हीसीएस क्लस्टर म्हणजेच 143 चार्जिंग पॉईंट्स उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांना आपले इलेक्ट्रीक वाहन चार्ज करण्यासाठी उद्याने, मोकळ्या जागा, बस टर्मिनस, मॉल, वाणिज्य संकुले अशा वर्दळीच्या स्थळांजवळच इलेक्ट्रीक वाहन चार्जींग सुविधा उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरकारी खाजगी भागीदारी तत्वावर 24 ईव्हीसीएस क्लस्टर म्हणजेच 143 चार्जिंग पॉईंट्सपैकी सद्यस्थितीत परिमंडळ 1 साठी 4 चार्जिंग स्टेशन तसेच परिमंडळ 2 साठी 4 चार्जिंग स्टेशन असे एकूण 8 चार्जिंग स्टेशन म्हणजेच 48 चार्जिंग पॉईंटस उभारण्यात येत आहेत. जागेच्या उपलब्धतेप्रमाणे नियुक्त एजन्सीला ईव्हीसीएस उभारण्याकरिता जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून च/ी घरू इशश इरीींंशीळशी झीर्ळींरींश ङळाळींशव | च/ी ठेरव ॠीळव खपवळर झीर्ळींरींश ङळाळींशव | च/ी ऊशश्रींर एश्रशलेीींपळली खपवळर झीर्ळींरींश ङळाळींशव ा एजन्सीज् मार्फत चार्जिंग स्टेशन/ क्लस्टर स्वखर्चाने उभारणी करण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेस रु.4 प्रती किलोव्हॅट इतके उत्पन्न मिळणार आहे. 15 व्या वित्त आयोगांतर्गत मिलीयन प्लस सिटी गटातील शहरांना हवा गुणवत्ता सुधारणा घटकाकरिता प्राप्त निधीमधून यासाठी रू. 2 कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्व पब्लिक चार्जींग स्टेशन्स यावरील जाहीरातीकरीता महापालिकेने संबंधित एजन्सीला विद्युत रोषणाईसहीत मोकळी जागा नेहमी उपलब्ध करुन द्यावयाची आहे. सदर जाहिरातींपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये पालिकेचाही हिस्सा असणार आहे. शिवाय या जागांवर पालिका विविध शासकीय योजना/उपक्रम यांच्या जाहीराती/होर्डींग्ज प्रदर्शित करु शकतील. पब्लिक चार्जींग स्टेशन क्षेत्राच्या ठिकाणी मोकळी जागा उपलब्ध असल्यास पालिकेच्या पूर्वपरवानगीने नियुक्त एजन्सी पाकीटबंद खाद्यपदार्थ/पाणी इत्यादी विक्रीसाठी किऑक्स उभारु शकतील.
अशाप्रकारे पर्यावरणपूरक दृष्टिकोन जपत नवी मुंबई पालिकेच्या वतीने इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी पहिल्या टप्प्यात दोन्ही परिमंडळ क्षेत्रात प्रत्येकी 4 अशी एकूण 8 इलेक्ट्रिक वाहन सार्वजनिक चार्जींग स्टेशन उभारण्यात येत असून ही बाब नवी मुंबईची ओळख पर्यावरणशील शहर म्हणून दृढ करण्यामध्ये लक्षणीय भर घालणारी आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai