नवी मुंबई विमानतळाची सुरक्षा एनएमआयएकडे
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 22
नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एनएमआयए) सुरक्षेची जबाबदारी बुधवारपासून अधिकृतपणे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) हस्तांतरित करण्यात आली आहे. यानंतर हा देशातील सीआयएसएफच्या सुरक्षा कवचाखाली येणारा 71 वा विमानतळ ठरला आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळाचे उदघाटन झाल्यानंतर 21 दिवसात विमानतळाची सूरक्षा यंत्रणा हस्तांतरीत झाल्यामुळे यापूढे विमानतळावरून पहिल्या उड्डाणाकडे नवी मुंबईतील विमान प्रवाशांचे लक्ष लागले आहे. डिसेंबरमध्ये या विमानतळावरून नियमित विमानोड्डाण सुरू करण्यापूर्वी तिकीट बुकींगसाठी अनेक उत्साही प्रवासी लक्ष ठेऊन आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेची धुरा अखेर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने स्वीकारली असून, बुधवारी हा ऐतिहासिक हस्तांतरण सोहळा विमानतळाच्या परिसरात पार पडला. सीआयएसएफचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी या निमित्ताने माध्यमांना संबोधित करत “एनएमआयए हे देशातील 71 वे विमानतळ आहे जे आता सीआयएसएफच्या संरक्षणाखाली आले आहे,” अशी माहिती दिली.सीआयएसएफ दलाने त्यांच्या अधिकृत एक्स या माध्यमावरून या हस्तांतरणाची माहिती प्रसिद्ध केली. दलाने नमूद केले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा कार्यवाही अत्याधुनिक मानकांनुसार आणि सर्व संबंधित संस्थांच्या घनिष्ठ समन्वयाने राबवली जाईल. या अंतर्गत मुख्य आणि गौण अशा दोन्ही सुरक्षा क्षेत्रांमध्ये सीआयएसएफ तैनात राहील.
सप्टेंबर महिन्यापासून विमानतळाच्या सूरक्षेसाठी तीन टप्यात सीआयएसएफ दलाकडे विमानतळ सूरक्षा टप्याटप्याने देण्यात आली. 920 जवान आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली यापुढे विमानतळाची सूरक्षा असणार आहे. प्रवीर रंजन यांनी सांगितले की, “सीआयएसएफचे दल नेहमीच व्यावसायिकतेला, सतर्कतेला आणि प्रवासी-अनुकूल दृष्टिकोनाला प्राधान्य देत असते. नवी मुंबई विमानतळावरही आम्ही सर्वोच्च दर्जाची हवाई सुरक्षा सुनिश्चित करू.” त्यांनी पुढे सांगितले की, या विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था देशातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक मजबूत आणि समन्वित केली जाणार आहे.या हस्तांतरणामुळे नवी मुंबई विमानतळाच्या कार्यप्रणालीत एक नवे पर्व सुरू झाले आहे. देशातील सर्वात महत्त्वाच्या प्रगत विमानतळांपैकी एक ठरणाऱ्या एनएमआयए विमानतळावर आता सीआयएसएफचे सक्षम आणि अनुभवी सुरक्षा कवच उपलब्ध झाले असून, त्यामुळे प्रवाशांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai