मौजमजेसाठी वाहने, मोबाईलची चोरी
- by Aajchi Navi Mumbai
- May 14, 2021
- 783
3 अल्पवयीन ताब्यात ; 3 लाख 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
पनवेल : मौजमजेसाठी दुचाकी, रिक्षा, लॅपटॉप व मोबाईल चोरणार्या 3 अल्पवयीन बालकांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हयातील 3 अल्पवयीन बालकांना रोडपाली, कळंबोली येथुन ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्हयातील चोरी झालेली मोटारसायकल व इतर मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडुन पनवेल शहर, खारघर व सानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील गुन्हे उघडकीस आले आहेत.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी ऑटो मोबाइल समोर, नंदनवन सोसायटी येथे पार्क करुन ठेवलेली सुझुकी एक्सेस मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याने त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्हयातील 3 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले. या बालकांना गुरुवारी बाल न्याय मंडळ, कर्जत यांच्यासमोर हजर करुन बाल निरीक्षण गृह कर्जत येथे रवानगी केली आहे. गुन्हयातील 3 अल्पवयीन बालक हे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांना बेवारस सापडलेल्या मोटारसायकलच्या चाव्या गोळा करून जवळ ठेवत असत आणि रात्रीच्या वेळेस फिरत असताना ज्या मोटारसायकलला चावी लागेल ती मोटारसायकल चोरी करत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच चोरी केलेल्या मोटारसायकलचे पेट्रोल संपल्यानंतर बेवारसपणे त्याठिकाणीच सोडून देत असत. त्याचप्रमाणे रहिवासी सोसायट्यांमधील वॉचमन झोपल्यानंतर चार्जिंगला लावलेले मोबाईल फोन देखील चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरच्या 3 अल्पवयीन बालकांकडून 2 लाख 10 हजार रूपये किंमतीच्या 5 मोटारसायकल, 45 हजार रुपये किंमतीची ऑटो रिक्षा, 28 हजार रूपये किंमतीचे 3 मोबाईल फोन, 25 हजार रूपये किंमतीचा लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, काळ्या रंगाचे आवरण असलेल्या 12 मोटारसायकलच्या चाव्या आणि एक बॅग असा एकूण 3 लाख 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच उर्वरीत 3 मोटारसायकल व 2 मोबाईल फोनबाबत अभिलेख तपासणी सुरू आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai