कारच्या काचा फोडून चोरी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2025
- 94
नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या दोन दिवसात तीन ठिकाणी पार्किंग केलेल्या कारच्या काचा फोडून आतील ऐवज चोरी करण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. यातील दोन घटना वाशी सारख्या कायम गजबजलेल्या आणि पे अँड पार्क सुविधा असणाऱ्या ठिकाणी झाल्या असून एक ऐरोली येथे झाली आहे. या घटनांच्या मुळे रस्त्यावर वाहन पार्किंग करणे धोक्याचे ठरत आहे.
सीबीडी येथे राहणारे व ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे जसपालसिंग सिद्धू हे कामानिमित्त वाशी येथे आले होते. त्यांनी त्यांची कार वाशी सेक्टर 17 येथील एका ठिकाणी पार्किंग मध्ये पार्क केली होती. ते रात्री सव्वा सात वाजता एका कार्यालयात गेले व घरी जाण्यास सव्वा नऊ वाजता तेथून बाहेर पडले. ते गाडी जवळ आले असता गाडीची काच फोडलेली आढळून आली. त्यांनी तात्काळ गाडीच्या आतील काही चोरी झाले का याची तपासणी केली असता गाडीतील एक बॅग आढळून आली नाही. याच बॅगेत त्यांनी 15 लाख 70 हजार रुपयांची रोकड ठेवली होती. चोरी झाल्याची खात्री पटल्यावर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी करून गुरुवारी अपरात्री अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
दुसऱ्या घटनेत वसई येथे राहणारे जतीन गोहिल हे कामानिमित्त ऐरोली येथे आले होते. आपले काम आटोपल्यावर ते सेक्टर 19 येथील पूवाज नावाच्या हॉटेल मध्ये जेवण करण्यास गेले. जेवण करून घरी जाण्यासाठी गाडी जवळ आले असता गाडीची काच फोडलेली आढळून आली तसेच आतील 70 हजार रुपयांचा लॅपटॉप, 700 रुपयांचा चार्जर, अन्य एक 45 हजार रुपयांचा लॅपटॉप अन्य काही किरकोळ किमतीच्या वस्तू अशा एकूण 1 लाख 16 हजार 750 रुपयांच्या बारा वस्तूंची चोरी झाल्याचे समोर आले. यात काही कागदपत्रांचा समावेश आहे. हि चोरी बुधवारी सकाळी साडे आठ ते पावणे दहाच्या दरम्यान झाली आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.ि तसऱ्या घटनेत चेंबूर येथील बांधकाम व्यवसायिक अक्षय बागल हे वाशीत आले होते. त्यांनी वाशी स्टेशन परिसरातील भगवान महावीर मार्गावर आपली गाडी पार्क करून एका ठिकाणी कामानिमित्त गेले होते. परत आल्यावर त्यांच्या गाडीची काच फोडून आतील 9 लाखांची रोकड चोरी झाल्याचे उघडकीस आले. हि घटना 7 तारखेला संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटे ते सात वाजून 36 मिनिटे दरम्यान घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai