पोलीसांना रेनकोट वाटप

शिवसेना विभाग प्रमुख महेश कोटीवाले यांचा उपक्रम 

नवी मुंबई ः कर्तव्य सामाजिक संस्थेच्यावतीने तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील 105 पोलीस कर्मचार्‍यांना रेनकोट वाटप करण्यात आले. शिवसेना विभाग प्रमुख महेश कोटीवाले व कर्तव्य सामाजिक संस्थेचे सचिव यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   

प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावे यासाठी पोलिस बांधव 24 तास ड्यूटी करत असतो. कोविड काळात देखील आपल्या परिवारापासून दूर राहून तसेच आपल्या जीवाची पर्वा न करता भर नागरिकांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे होते. उन्हाळा असो किंवा पावसाळा पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. या पोलीस बांधवांचे आभार व्यक्त करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना एक छोटीसी भेट म्हणून रेनकोट वाटप करण्यात आले. यासाठी महेश कोटीवाले व त्यांच्या संस्थेने पुढाकार घेतला. 

या प्रसंगी तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र आव्हाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक डोम, गोपिनिय विभागाचे मनोज पाटील, विष्णू बेडकुळे तसेच पोलीस कर्मचारी, उद्योजक संतोष कानसे साहेब, उपशाखा प्रमुख इस्माईल शेख, विषेश कार्यकारी अधिकारी गोरखनाथ बुरकुल, अन्वर खान, महाराजा पिल्ले, कुणाल गांगण, गोपाल बोरुडे आदि मान्यवर उपस्थित होते.