पनवेल पालिकेत 650 कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 17, 2024
- 518
अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण व मलप्रक्रिया केंद्रासाठी पुढाकार
पनवेल ः पनवेल महापालिकेतील 650 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहासह विविध कामांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. भूमिपूजनाचा कार्यक्रम कळंबोली येथे पार पडला.
यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या समारंभात सुमारे आठ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याचबरोबर खारघर नोडमधील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण व पुनर्पृष्ठीकरण, कळंबोली नोडसह महापालिका मुख्यालयलगतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व उन्नतीकरण, पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्गाचे काँक्रिटीकरण आदी 233 कोटी रुपयांच्या कामासह 257 कोटी रुपयांचे अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या व मलप्रक्रिया केंद्र उभारणे आणि 148 कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठा वितरण व्यवस्था उभारण्याच्या कामाचे ऑनलाईन पद्धतीने मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून उद्घाटन करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण होते. तसेच यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश बालदी, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रकाश शेंडगे, आमदार रमेश शेंडगे, आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल महापालिकेचे सर्व उपायुक्त, अधिकारी, कर्मचारी, कळंबोली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पालिकेने कामे करण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाच्या पाठिंब्यामुळे जीएसटीचे अनुदान पालिकेस सुरू झाले असून येत्या काळात अमृत 2.0 अंतर्गत मिळालेल्या भरीव निधीच्या माध्यमातून महापालिकेने एसटीपी प्लॅन्टची कामे सुरू केली आहे. येत्या काळात शंभर टक्के ड्रेनेजची कामे झालेली पनवेल महापालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महापालिका असणार आहे. - गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai