निवडणूक घ्यायची घाई का?
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 07, 2025
- 66
सहा महिने वाढवूनयादी दुरुस्तीची अमित ठाकरे यांची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबईत मनसेतर्फे शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी ‘खोट्या मतदारांचे प्रदर्शन’ भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची, एवढी घाई का झाली आहे? हेच समजत नाही. घाईघाईत निवडणुक लावण्याची काहीही गरज नाही. अजून सहा महिने घेऊन मतदार यादी दुरुस्त करा. अशी मागणीही अमित ठाकरे यांनी यावेळी केली.
नवी मुंबईत मतदार याद्यांमधील घोळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड केल्यानंतर, हे घोळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून वाशी येथे खोट्या मतदारांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी अमित ठाकरे यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन करून मतदार यांद्यांमधील घोळाचा आढावा घेतला. अमित ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत, हे पाहताना वाईट वाटतंय आणि काय बोलायचं हेच समजत नाही. निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची, एवढी घाई का झाली आहे? हेच समजत नाही. हा गोंधळ तातडीने थांबवला पाहिजे. हे केवळ प्रदर्शन नाही तर प्रत्येक खऱ्या मतदारांच्या गालावर चपराक आहे.’ अशी तीव्र प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी, “बोगस मतांच्या आधारे सत्ताधारी जिंकून येत आहेत. तब्बल 96 लाख दुबार मतदार यादीत घुसवले गेले आहेत. मृत व्यक्तींची नावे अजूनही मतदार यादीत आहेत. राज्य आणि केंद्र निवडणूक आयोग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. म्हणून निवडणूक घाईघाईत लावण्याची काहीही गरज नाही. अजून सहा महिने घेऊन मतदार यादी दुरुस्त करा.” अशी मागणीही अमित ठाकरेंकडून यावेळी करण्यात आली. मनसेने मतदार यादीतील घोळ उघड करूनही ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या त्यानुसार, निवडणूक आयोग सुधारणार नसल्याचेही अमित ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरात लवकर महापालिका निवडणुका लागण्याचा अंदाज अमित ठाकरेंनी व्यक्त केला असून, प्रत्येक खऱ्या मतदाराने येत्या निवडणुकीत घरा बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच दुबार मतदान करणाऱ्यांचे काय करायचे ते राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितले आहे. त्याची चिंता मतदारांनी करू नये. असे म्हणत दुबार मतदान करणाऱ्यांना मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असा इशाराही अमित ठाकरेंनी यावेळी दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai