पहिल्या टप्प्यात बंपर मतदान
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 19, 2024
- 424
महाराष्ट्रात 55.29 टक्के तर प.बंगालमध्ये सर्वाधिक 77.57 टक्के मतदान
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी देशात पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 1600 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे. सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभेच्या 92 जागांवरही आज मतदान झाले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील एकूण पाच मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत 54.85 मतदान झाले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 16.63 कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये 8.4 कोटी पुरुष आणि 8.23 कोटी महिला मतदार आहेत. त्यापैकी 35.67 लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तर 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 3.51 कोटी आहे. यासाठी 1.87 लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत पश्चिम बंगाल, त्रिपुरा ते मेघालयपर्यंत बंपर मतदान झाले. त्याचवेळी यूपी-बिहार आणि मध्य प्रदेशातील मतदारांमध्येही उत्साह दिसून आला. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील 4, यूपीमधील 8 आणि बिहारमधील 4 जागांवर मतदान झाले. याशिवाय तामिळनाडू (39) आणि उत्तराखंड (5 जागा) च्या सर्व जागांवर मतदान झाले.
- 2009 मध्ये 58.2% च्या तुलनेत 2014 मध्ये 66.4% मते पडली. 2014 मध्ये 66.4 टक्क्यांच्या तुलनेत 2019 मध्ये 67.3 टक्के मतदान झाले.
कोणत्या राज्यात किती मतदान?
- अरुणाचल प्रदेश 65.46 टक्के
- आसाम 71 .38 टक्के
- बिहार 47. 38 टक्के
- छत्तीसगड 63.41 टक्के
- जम्मू काश्मीर 65.08 टक्के
- लक्षद्विप 59.02 टक्के
- मध्यप्रदेश 63.33 टक्के
- महाराष्ट्र 55.29 टक्के
- मणिपूर 68.62 टक्के
- मेघालय 70.26 टक्के
- मिझोरम 54.18 टक्के
- नागालँड 56.77 टक्के
- पुद्दुचेरी 73.25 टक्के
- राजस्थान 50.95 टक्के
- सिक्कीम 68.06 टक्के
- तामिळनाडू 62.06 टक्के
- त्रिपुरा 79.90 टक्के
- उत्तर प्रदेश 57.61 टक्के
- उत्तराखंड 53.64 टक्के
- पश्चिम बंगाल 77.57 टक्के
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai