Breaking News
मुंबई ः राज्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कसती जमीन, राहते घरे, दुकाने सगळेच उद्धवस्त झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेज जाहीर केले. यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 253 तालुक्यातील 68 लाख हेक्टर इतक्या जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी भागात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला, तेव्हापासून मदतीच्या पॅकेजची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकजेची घोषणा केली. नुकसान झालेल्या सर्वाना सरसकट मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे. शेतकरी, नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे.
ज्यांच्या घरांचे 100 टक्के नुकसान झाले आहे त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून नवीन घर देण्यात येणार आहे. डोंगरी भागातील घरे, अंशतः नुकसान झालेली घरे, गोठे, गुरांचे नुकसान, मृत व्यक्ती, जखमी अशा सर्व नुकसानग्रस्तांना मदत मिळणार आहे. शेतकरी रब्बीचे पिक घेतोय की नाही हे विचारत न घेता आम्ही 10 हजार रुपयांची मदत करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जनावरे आणि घरासाठीही मदतनिधी
पीक नुकसानभरपाई
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai