’स्वच्छता अभियान’ साजरा

नवी मुंबई ः प्रकल्पग्रस्त महिला आघाडी नवी मुंबई व शांती संस्था़ कोपरखैरणे येथे स्वच्छता आभियान कार्यक्र्र्रम करण्यात आला. यावेळी प्लॅस्टीकमुक्ती व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. 

 या कार्यक्रमाला पालिकेचे कोपरखैरणे येथील स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे व पोटफोडे यांनी स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. ‘स्वच्छताहीच सेवा असते’, प्रत्येक घरातील माता ही आपली गुरू असते. सर्व पालकांना स्वच्छतेच्या बाबतीत सुका व ओला कचरा वेगळा ठेवावा़, प्लॅस्टीक पिशवीचा वापर करू नये़ कापडी पिशवीचा वापर करावा, प्लॅस्टीकमुक्ती, स्वच्छतेबाबत माहिती दिली. अ‍ॅड पी.सी.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातुन सांगितले की़ ’स्वच्छता असेल जिथे लक्ष्मी नांदेल तिथे’ या वाक्यातून सर्वाना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.

जयश्री पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून प्रल्हाद खोसे यांनी सांगितल्याप्रमाणे सुका व ओला कचरा वेगळा ठेवावा, प्लॅस्टीक पिशवी बाजारात न नेता किंवा न मागता कापडी पिशवी वापरात आणून आपली नवी मुंबई, आपला देश़, आपले गाव, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करू या असे उपस्थितांना सांगितले. बालसंस्कारच्या मुलांनी स्वच्छतेच्या बाबतीत सांस्कृतिक कार्यक्र्रम सादर केला व स्वच्छतेच्या घोषणा देत रॅलीत सहभाग घेतला. यावेळी महिला व पुरूष कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित होते.