86 % बालकांनी घेतला पोलिओचा लाभ
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 13, 2025
- 184
नवी मुंबई ः महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने रविवार, 12 ऑक्टोबर 2025 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नियोजनबध्द रितीने प्रभावीपणे राबविण्यात आली. पालिकेच्या 26 नागरी आरोग्य केंद्रांमार्फत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, बाजारपेठ, टोल नाके अशा विविध ठिकाणी 618 स्थायी, 76 ट्रांझिट व 27 फिरते मोबाईल अशाप्रकारे 721 इतक्या मोठया संख्येने पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी - या घोषवाक्यास अनुसरून घरोघरी जाऊन नागरी आरोग्य केंद्रांमार्फत पोलिओ लसीकरण मोहीमेची जनजागृती करून पोलिओ लसीकरणाची माहिती सर्वदूर पोहचविण्यात आली.
लसीकरण बूथवरील 2 हजारहून अधिक कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यामार्फत बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. अपेक्षित लाभार्थ्यापैकी 86 % बालकांनी पोलिओ लसीचा लाभ घेतला. 100 % लाभार्थींचे पल्स पोलिओ लसीकरण व्हावे याकरिता दि. 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून ज्या बालकांना रविवारी बूथवर जाऊन डोस घेता आलेला नाही, अशा बालकांसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. यासाठी घरांना भेट देणाऱ्या नमुंमपाच्या स्वयंसेवकांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai