Breaking News
मुंबई ः देशात नुकताच 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून आज 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यंदा महाराष्ट्रातील 48 जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचे दिसून आले आहे. 48 पैकी 29 महाविकास आघाडी तर 18 महायुती व इतर 1 असे आकडे हाती आले आहेत.
महाराष्ट्रातही अनेक अनपेक्षित आणि आश्चर्यचकित करणारे निकाल लागले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीमधील फुटीनंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक राजकारण करण्यात आले असून या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो याची सर्वांना उत्सुकता होती.
ठाकरे गटाने महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 21 जागा लढवल्या. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवाडीनुसार, त्यापैकी 10 जागांवर त्यांना विजय मिळाल्याचे चित्र आहे. तर काँग्रेसने 17 पैकी 13 जागा पदरात पाडल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या त्यापैकी 6 जागा निश्चित मानल्या जात आहेत. महायुतीमध्ये भाजपाने सर्वाधिक 23 जागा लढवल्या. त्यापैकी 11 जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर शिंदे गट 15 पैकी 6 जागा जिकंल्या आहेत. अजित पवार गटाने 4 पैकी केवळ एकाच जागेवर झेंडा फडकवला आहे. एकंदरीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या बाजुने कौल दिल्याचे पाहायला मिळत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai