महाराष्ट्रातील हे खासदार राज्यमंत्रीपदी
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 11, 2024
- 473
मुंबई ः नरेंद्र मोदी यांनी तीसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह कॅबिनेट व राज्यमंत्री पदावरील सदस्यांनीही शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याबला 2 कॅबिनेट तर चार राज्यमंत्रीपद आली आहेत. प्रतापराव जाधव, रक्ष खडसे, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवल यांनी राज्यमंत्रपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्रातून नितीन गडकरी यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी देण्यात आली. तसेच पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत जिंकून येणारे उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनाही केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. तसेच त्याआधी त्यांनी आमदारकीचीदेखील हॅटट्रीक मारली होती. प्रतापराव जाधव यांची आता केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार दिला आहे.
भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचीदेखील मोदींच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रक्षा खडसे या तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित तरुण खासदार मुरलीधर मोहोळ यांनादेखील केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीदेखील राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोदींच्या नेतृत्वातील याआधीच्या सरकारमध्येही रामदास आठवले हे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री होते. त्यांची आता पुन्हा राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai