115 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 11, 2024
- 445
नवी मुंबईतील तीन पोलीसांचा समावेश
पनवेल : राजभवन येथे आयोजित समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्राती 115 पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पोलीस पदके, गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवंत सेवेसाठी पोलीस पदके प्रदान केली. यामध्ये नवी मुंबई दलातील तीन पोलीस अधिकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
राज्याच्या गृहविभागाने 2022 साली प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) राष्ट्रपती महोदयांनी गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल पोलीस पदकाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर पदक अलंकरण सोहळा 6 जून रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पोलीस अधिकाऱ्यांना राज्यपाल भवनात पदक प्रदान करण्यात आले. नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने तीन दिवसांपूर्वी राज्यपाल भवनात सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये नवी मुंबई पोलीस दलाचे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र मिसाळ तसेच पोलीस उपनिरिक्षक निघोट यांना पदक व सन्मानपत्राने गौरविण्यात आले आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदक विजेत्या पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त लांडगे यांनी यापूर्वी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सेवेत सोनसाखळी चोरीतील सराईत चोरट्याला पोलीस पथकासह गोळीबार करुन पकडले होते. तसेच आंतरराज्य तांदुळ घोटाळा लांडगे यांनी उघडकीस आणला होता. कळंबोली येथील बॉम्ब प्रकरणासह, पोलीसाची हत्या करुन त्याचा अपघाताचा बनाव केल्याप्रकरणाची त्यांनी उकल केली होती. अशा अनेक उल्लेखनीय तपासामुळे त्यांचा सन्मान करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई पोलीस दलाकडून देण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai