Breaking News
मुंबई ः धरणातील पाणीपातळी खालावल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाण्याचे नियोजन करुन त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या शहरांमध्ये पाणीकपात लागू केली. मुंबई व उपनगरांसपाणी पुरवणाऱ्या धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. सद्यस्थितीत मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 8.59% इतका आहे. 2023 मध्ये या दिवशी उपयुक्त पाणीसाठा 17.66% होता. तर नवी मुंबईच्या मोरबे धरणात 53.880 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. त्यामुळे जुलै-ऑगस्ट महिन्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडला नाही तर राज्यात जलसंकट येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडक सागर, विहार आणि तुळशी तलावातून दरदिवशी 3,800 पाणी मिळते. या सातही धरणांची मिळून 14,47,363 दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सद्यस्थितीत या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता 1,24,343 दशलक्ष लिटर इतका आहे. या तलावांमधील उपयुक्त पाणीसाठा 8.59% इतका आहे, जो मागील वर्षी याच दिवशी 17.66 % इतका होता. म्हणज गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठी दुप्पट क्षमतेने कमी आहे. नवी मुंबई महापालिकेला मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या मोरबे धरणक्षेत्रात फक्त 625.60 मिमि पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात 3,300 मिमी पावसाची गरज असते तरच नवी मुंबईला वर्षभर पाणी पुरवले जाऊ शकते. सध्या धरणात 55.202 दशलक्ष घनमीटर म्हणजे 28.91 टक्के पाणी शिल्लक आहे. मोरबे धरणाची पाणीपातळी कमी झाल्याने कधीनव्हे ती शहरात आठवड्यातून तीन दिवस एक वेळ पाणीकपात करावी लागत आहे. पनवेल
त्यात हवा त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने ‘थेंबे थेंबे पाणी वाढे' अशी अवस्था या जलाशयांची झाली आहे. यावर्षी वेळेआधीच पाणीसाठ्यांनी तळ गाठला. उरलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सर्वच महापालिकांना पाणीकपात लागू करावी लागली आहे. पावसाळा सुरु झाला की मुबलक पाणी मिळले अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र जुन महिना जवळपास कोरडाच गेल्याने या अपेक्षवर पाणी फेरले. जुन महिन्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढली नाही. गेल्या आठ दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत असल्याने हळूहळू पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे जोपर्यंत मुबलक पाऊस पडत नाही तोपर्यंत पाणीकपातीचा सामना करावाच लागणार आहे. त्यामुळे आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर भिस्त असणार आहे. या कालावधीत जर राज्यात कमी पाऊस पडला तर मात्र जलसंकट अटळ आहे.
मुंबईच्या पाणीसाठ्याची माहिती
मोरबे - 55.202 दशलक्ष घनमीटर 28.91 टक्के
महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये एकूण 40506.03 द.ल.घ.मी पाणीसाठा आहे, जो त्यांच्या पूर्ण क्षमतेच्या केवळ 23.26 टक्के आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात राज्याला अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
विभागनिहाय पाणी साठवण तपशील
विभाग उपयुक्त पाणी साठवण क्षमता सध्याचा उपयुक्त जलसाठा
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस